मुंबईत आढळला कोरोनाचा चौथा रूग्ण  

मुंबईत आढळला कोरोनाचा चौथा रूग्ण  
मुंबई :  राज्यात करोनाचा धोका वाढला असून या विषाणूचा फैलाव वाढू लागला आहे. राज्यात करोनाबाधितांची संख्या १८वर पोहोचली आहे. दहा रुग्ण हे पुण्यातील आहेत. तर नागपुरात तीन रुग्णांना करोनाची लागण झाली आहे.  मुंबईत हा आकडा चारवर पोहोचला आहे. चाचणी अहवालात रुग्णाला करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे.  राज्यात करोनाचा फैलाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारी म्हणून मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड येथील व्यायामशाळा, जलतरण तलाव, नाट्य-सिनेमागृहे आज मध्यरात्रीपासून बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. रेल्वे आणि बसेस या अत्यावश्यक सेवा आहेत. त्यामुळे त्या बंद करता येणार नाही.

सार्वजनिक वाहतूक अशी बंद करता येणार नाही. मात्र, नागरिकांनी विनाकारण प्रवास करू नये. कारण असेल तरच प्रवास करा, असं सांगतानाच मॉलमध्ये जाणंही नागरिकांनी टाळावं, असं आवाहन त्यांनी केलं.  खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईत आणखी एक करोनाबाधित रुग्ण सापडल्यानं खळबळ उडाली आहे. मुंबईत करोनाग्रस्त रुग्णांची संख्या चार झाली असून, राज्यातील हा आकडा १८वर पोहोचला आहे. 

WebTittle ::  The fourth coronary patient found in Mumbai


 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com