शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणीच लसीकरण करा.....
Rakesh Tikait

शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणीच लसीकरण करा.....

नवी दिल्ली : शेतकरी विरोधी तीन कायदे Farm Laws रद्द केल्याशिवाय शेतकरी घरी परतणार नाही. आंदोलनाची जागा आता शेतकऱ्यांचे Farmers घर बनली आहे. त्यामुळे लसीकरणासाठी या ठिकाणीच सुरू करावे, असे भारतीय किसान संघटनेचे नेते राकेश टिकैत Rakesh Tikait यांनी स्पष्ट केले. Give Corona Vaccine at Agitation site demands Rakesh Tikait

नवीन शेती कायद्यच्या विरोधात शेकडो शेतकरी सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देऊन आहेत. शेतकरी आंदोलनासाठी एकत्र येत असल्याने कोरोनाचा फैलाव होत असल्याचा आरोप होत आहे. त्यावर टिकैत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

ते म्हणाले, ‘‘आंदोलन स्थळ हेच आता शेतकऱ्यांचे घर झाले आहे. ते सोडून त्यांना कुठे जायला सांगणार? कोरोनाचा फैलाव काय येथून होतोय का? हे तर आमचे घर आहे. अनेक शेतकऱ्यांनी लसीचा Corona Vaccine पहिला डोस घेतला आहे. अनेक जण दुसरा डोस मिळावा म्हणून झगडता आहेत. त्यासाठी अधिकाऱ्यांनी येथेच लसीकरण सुरू करावे.’’ Give Corona Vaccine at Agitation site demands Rakesh Tikait

इफ्तारवेळी शेतकऱ्यांची कोविड नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोपही केला जात आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहो. त्यावर टिकैत म्हणाले, की पन्नास जणांना एकत्र येण्यास सरकारची परवानगी आहे. तिथे फक्त २२ ते ३५ लोक होते. तेही पुरेसे अंतर ठेऊन बसलेले होते. कुणी कुणास भेट नाही आणि हस्तांदोलनही केले नाही.
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com