काळी, पांढरी आणि पिवळ्या बुरशीनंतर आता देशात 'हिरव्या' बुरशीचा सापडला रूग्ण !

काळी, पांढरी आणि पिवळ्या बुरशीनंतर आता देशात 'हिरव्या' बुरशीचा सापडला रूग्ण !
Green fungus Patient has found in the country

मुंबई : मागील दीड वर्षांपासून देशात कोरोना Corona विषाणूने अक्षरशः थैमान घातले आहे. कोरोना विषाणूला दीड वर्षानंतरही शास्त्रज्ञांना पूर्णपणे समजून घेता आलं नाही. रोज नवीन विषाणू येत आहेत आणि त्यांच्या बाबतीत दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. देशाच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होत आहेत. कोरोना विषाणूनंतर पहिल्यांदा देशात म्युकरमायकोसिस Mucormycosis म्हणजेच ब्लॅक फंगसचा Black Fungus धोका वाढलेला दिसून आला. त्यानंतर नवीन बुरशीने म्हणजेच अनेक ठिकाणी व्हाईट फंगसचे White Fungus रुग्ण आढळून आले. यानंतर आली ती पिवळी बुरशी Yellow Fungus. या बुरशीचा रुग्ण देखील सापडला होता. यानंतर आता नवीन बुरशी म्हणजेच ग्रीन फंगसचा Green Fungus देखील रुग्ण आढळून आला आहे. Green fungus Patient has been found in the country

मध्य प्रदेशात MP ब्लॅक फंगस आणि व्हाईट फंगसनंतर आता ग्रीन फंगसचा देखील रुग्ण आढळला आहे. इंदौर मधील ३४ वर्षीय तरुणाला फंगस ची लक्षणे आढळून आली.  या तरुणाला यापूर्वी कोरोना लागला होता. कोरोनातून बरे झाल्यानंतर तो पोस्ट कोविडचा रुग्ण झाला. त्यामुळे इंदौर मधील अरविंदो रुग्णालयात त्याने उपचार घेण्यास सुरुवात केली. उपचारादरम्यान, त्याच्या फुफ्फुसात आणि सायनसमध्ये एस्परगिलस फंगस म्हणजेच ग्रीन फंगस आढळून आला आहे.

फुफ्फुसात त्यांना ९० टक्के संसर्ग झाल्यानंतर सोमवारी चार्टर्ड विमानानं मुंबईला Mumbai आणण्यात आले आहे. मुंबई मधील हिंदुजा रुग्णालयात दाखल या रुग्णाला करण्यात आले. तपासणी झाल्यावर आधीच्या ब्लॅक फंगसपेक्षा ग्रीन फंगस अधिक धोकादायक असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे. डॉक्टरांनी यावर सांगितले की, दीड महिन्यांपूर्वी रुग्ण जेव्हा उपचारसाठी याठिकाणी आला होता. त्यावेळेस त्याच्या उजव्या फुफ्फुसात पूर्णपणे पू भरलेला होता. त्याचा ताप १०३ अंशांपेक्षा कमी येत नव्हता. त्याची प्रकृतीही चिंताजनक होती. अशी माहिती डॉक्टरांना दिली होती. 

दरम्यान, हिरव्या बुरशीचा संसर्ग झाल्याची ही देशातील पहिलीच केस आहे. अॅम्फोटेरेसिन हे इंजेक्शन म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत आहे

हे देखील पहा - 

एस्परगिलस फंगस म्हणजे काय आहे ?

एस्परगिलस फंगसला सामान्यत: यलो फंगस आणि ग्रीन फंगस म्हणून ओळखलं जात. कधीकधी याला फंगस ला ब्राऊन फंगस म्हणुन देखील संबोधलं जाते. इंदौर मेडिकल कॉलेजच्या मायक्रोबायोलॉजीच्या Microbiology विभागप्रमुख अनिता मुथा यांनी माहिती दिली की, देशात अशाप्रकारच्या फंगसची ही पहिलीच घटना आहे. याचा परिणाम फुफ्फुसांवर वेगानं होतो. डॉक्टरांकडून याबाबत अधिक संशोधन केलं जात आहे.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com