जालन्यात चक्रीवादळासह गारांचा पाऊस; शेतीचे मोठे नुकसान

जालन्यात चक्रीवादळासह गारांचा पाऊस; शेतीचे मोठे नुकसान
jalna

जालना : जालना Jalna जिल्ह्यातील परतूर Partur तालुक्यात चक्रीवादळासह Storm गारांचा अवकाळी पाऊस Heavy Rain झाल्याने शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. संध्याकाळी सहाच्या सुमारास अचानक आलेल्या या चक्री वादळाचा केळी,मोसंबी,पपई,आंबा सह इतर पिकांना मोठा फटका बसला आहे. Hailstorm With Cyclone In Jalna Big Loss Of Agriculture

हे देखील पहा -

तर या चक्रीवादळामुळे अनेक घरावरील आणि गोठ्यावरील पत्रे उडाले आहेत. घरांचे आणि गाई-गुरांच्या गोठाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान Damage झाले आहे. मोठ्या प्रमाणत झाडे  उन्मळून पडली आहेत.

परतूर तालुक्यातील दैठणा बु,हरेराम नगर, दैठणा खुर्द ,येनोरा,खांडवीवाडी,माव या परिसरात संध्याकाळी आलेल्या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने अनेक ठिकाणी विदूत पोल, तारा तुटून पडल्याने अनेक भागातील विद्युत प्रवाह ही खंडित झाला आहे. Hailstorm With Cyclone In Jalna Big Loss Of Agriculture

गारांचा जोरदार मारा झाल्याने सौर उर्जा पंपाच्या प्लेट ही फुटल्या आहेत. चक्रीवादळ आणि गारांच्या पावसाने जोरदार तडाखा दिल्याने पिकाला मोठा फटका बसलाय. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे.

महसूल विभागाने परिसरातील पिकांची तात्काळ पाहणी पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी देण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. 

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com