अमरावती शहरात वादळी पाऊस, झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड वाहनांचे नुकसान

अमरावती शहरात वादळी पाऊस, झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड वाहनांचे नुकसान
Amravati

अमरावती : 'तौत्के' Tauktae चक्रीवादळामुळे Cyclone विदर्भातील Vidarbha अनेक जिल्ह्यात तीन दिवसात पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने IMD वर्तवला होता. त्यानुसार आज दुपारच्या सुमारास अमरावती Amravati शहरात City वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. हे वादळ सध्या केरळ, गोवा मार्गे कोकण किनारपट्टी वर सध्या येऊन धडकले आहे.

अमरावती शहरात आज दुपारच्या सुमारास आलेल्या या वादळी वारा Strong winds व पावसामूळे Rain वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी झाडांची Tree मोठी पडझड झाली असून वाहनांचे Vehicles देखील नुकसान Damageझाले आहे.

हे देखील पहा -

या वादळाच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अमरावती शहरात अचानक वादळी सुसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणावर झाडांची पडझड झाली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसराजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या कार व दुचाकीवर झाड पडल्याने कार व दुचाकीचे नुकसान झाले आहे.  शहरातील बियाणी चौक तसेच विद्यापीठ परिसरात वादळी वाऱ्यामुळे  झाडे उन्मळून पडली आहेत. 

एकंदरीत अवकाळी पावसामुळे अमरावती महापालिकेचे पितळ उघडे पडल्याचे दिसून आले आहे. कारण महापालिकेने मान्सून पूर्व नियोजन न केल्याने व वाढलेल्या झाडांची कटाई न केल्याने अनेक मोठी झाडे उन्मळून

पडली त्यामुळे शहरातील काही भागातील वीज पुरवठा बराच  वेळ खंडित झाला आहे. तर महापालिका प्रशासन आता रस्त्यावर पडलेली झाडे तोडण्यासाठी कामाला लागले आहे. महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीपासून सुमारे १५० किमी अंतरावरून तौक्ते चक्री वादळ पुढे सरकत आहे.

वादळामुळे किनारपट्टीवर लाटांचे तांडव आणि मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याचा फटका बसायला सुरुवात झाली आहे. आज हे वादळ महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टी भागात घोंगावत आहे. याचा फटका महाराष्ट्राच्या विविध भागात जाणवत आहे.  

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com