चंद्रपूरमधल्या तळीरामांना बसला 'एप्रील फूल'चा झटका!

चंद्रपूरमधल्या तळीरामांना बसला 'एप्रील फूल'चा झटका!
Drunkard

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदीला काल सहा वर्षे पूर्ण झाली आहे. राज्यात नवे सरकार आल्यानंतर दारुबंदी उठेल, अशी आस तळीरामांना होती, पण त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. तथापि, गेल्या सहा वर्षात या जिल्ह्यात 118 कोटींची दारू पकडण्यात आली असून, हा आकडा अवैध दारू कशी बिनबोभाट सुरू आहे, याची प्रचिती देत आहे. Hundred and Eighteen crore worth of illicit liquor seized in last six years in Chandrapur

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असताना आतापर्यंत पोलिसांनी (Police) शंभर कोटीच्यावर देशी-विदेशी अवैध दारू पकडली आहे . मात्र या पकडलेल्या दारूचे प्रमाण एकूण विक्रीच्या दोन टक्केसुद्धा नाही. त्यामुळे दारूबंदी कशी फोल ठरली आहे, हे सहज लक्षात येते. चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ पासून संपूर्ण दारूबंदी लागू झाली होती. दारूचा एक थेंब देखील जिल्ह्यात येणार नाही, असे तेव्हा सांगितले जात होते. मात्र, मागील सहा वर्षांत (फेब्रुवारी-२०२१ पर्यंत) तब्बल एकशे अठरा कोटी ३१ लाख ९९ हजार ४३८ रुपयांची अवैध दारू पोलिसांनी पकडली आणि ४७ हजार ३६२ दारूतस्करांना अटक केली आहे. 

राज्यात नवीन सरकार सत्तेवर येताच दारुबंदी उठवण्याच्या हालचालींना आणि चर्चांना वेग आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार(Guardian Minister Vijay Vadettiwar) यांनी लोकांची मागणी लक्षात घेत या दारूबंदीचा आढावा घेण्यासाठी मागील वर्षी एक समिती स्थापन केली आहे. त्याचा अहवाल राज्य शासनाकडे सादर झाल्यावर पुन्हा एक राज्यस्तरीय समिती चार महिन्यांपूर्वी स्थापन करण्यात आली आहे. Hundred and Eighteen crore worth of illicit liquor seized in last six years in Chandrapur

आता याही समितीचा अहवाल तयार झाला असून, तो मंत्रिमंडळापुढे ठेवला जाणार आहे. हा अहवाल आल्याबरोबर जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारू सुरू होईल, अशी मोठी आशा तळीरामांना होती. पण त्यादृष्टीने अनेक बंद हॉटेल्स आणि बारच्या इमारतींची रंगरंगोटी सुरू झाली होती. पण काल सारेच एप्रील फून बनले आहे.

वर्षनिहाय पकडलेली दारू
2015 मध्ये -
८ कोटी ९९ लाख ४६ हजार ४९८ रुपयांची दारू पकडली. सहा हजार आरोपी अटकेत
2016 मध्ये-
१४ कोटी ४६ लाख ४६ हजार २५६ 
2017मध्ये- 
२४ कोटी ५३ लाख ६२ हजार ७६७ ची देशी-विदेशी दारू पोलिसांनी पकडली. ९ हजार ८६० आरोपींना अटक.
2018मध्ये-
२३ कोटी २० लाख ५२ हजार ६३२ रुपयांची दारू जप्त.
2019 मध्ये-
२२ कोटी ५० लाख ४१ हजार ९९५ रुपयांची दारू पकडली. ८ हजार ८० आरोपीना अटक  
2020 मध्ये 
२२ कोटी १ लाख ७६ हजार ९७५ रुपयांची दारू पकडली. ४ हजार ९४४ तस्करांना अटक
2021 मध्ये- 
चालू वर्षाच्या फेब्रुवारी महिन्याअखेर दोन कोटी ५९ लाख ५४ हजार ३१५ रुपयांची दारू पोलिसांच्या हाती लागली आहे.

Edited By-Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com