भारताच्या पुर्व किनारपट्टीला चक्रिवादळाचा धोका

भारताच्या पुर्व किनारपट्टीला चक्रिवादळाचा धोका

भारताच्या पुर्व किनारपट्टीवर अम्फान चक्रिवादळाचा धोका निर्माण झालाय. या वादळामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र त्याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे या वादळाचा मॉन्सूनवर विपरित परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जातेय.

बंगालच्या उपसागरात सध्या अम्फान चक्रीवादळ दाखल होण्यास सुरूवात झालीय. पुढील 24 तासात अम्फान अतिशय भीषण चक्रीवादळात रुपांतरीत होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. ही बाब लक्षात घेता प. बंगालसह, ओडिसा आणि तामिळनाडूसह आठ राज्यांच्या किनारपट्टी भागात हायअलर्ट जारी केलाय. चक्रीवादळाचा धोका पाहता खबरदारी म्हणून सुमारे 11 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी करण्यात आलीय. 20 मे रोजी दुपारी हे वादळ या भागात धडकण्याची शक्यता आहे. परिणामी इथे जोरदार पाऊस आणि आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे. 

नेमका याच सुमारास सर्वसाधारण वेळेच्या पाच दिवस आधीच मॉन्सून अंदमान-निकोबार बेटांवर दाखल झालाय. मंगळवारपासून २२ मेपर्यंत बंगालच्या उपसागरासह अंदमान निकोबारचा बहुतांश भाग मॉन्सूनद्वारे व्यापला जाणं अपेक्षित आहे. त्यानंतर मॉन्सून मध्य भारताकडे सरण्यास सुरूवात होतो.

मात्र या चक्रिवादळामुळे मॉन्सूनची दिशा बदलण्याचा धोका निर्माण झालाय. तसं झाल्यास यंदा देशातलं पर्जन्यमान घटू शकतं.
अगोदरच कोरोनाच्या फटक्याने शेती व्यवसाय संकटात सापडलाय. त्यातच या चक्रिवादळाने पाऊस लांबल्यास खरीप हंगामाला त्याचा जबर फटका बसून बळीराजा अडचणीत येईल..  

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com