शिर्डीत साई संस्थानच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन ( पहा व्हिडिओ )

शिर्डीत साई संस्थानच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन ( पहा व्हिडिओ )
Saam Banner Template (1).jpg

शिर्डी : एकीकडे कोरोना Corona संसर्गामुळे आरोग्य व्यवस्थेवरचा ताण वाढत असताना शिर्डीत Shirdi साई संस्थानच्या Sai Sansthan रुग्णालयातील Hospital स्टाफमधील कर्मचारी आणि नर्स Nurses यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी स्टाफ मधील एकूण 180 कर्मचारी आणि नर्सचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरु आहे. Indefinite Strike of Sai Sansthan Hospital Staff in Shirdi

रुग्णालय व कोविड सेंटरमधील परिचारक व परिचारिका यांनी अचानकपणे सुरु केलेल्या या बेमुदत काम बंद आंदोलनामुळे Strike शेकडो रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. साईबाबा हॉस्पिल, साईनाथ रुग्णालय आणि कोविड सेंटर मधील स्टाफ आणि नर्सचे रुग्णालयासमोर समोर धरणे आंदोलन सुरु आहे. 

साई संस्थानने सेवेत कायम स्वरूपी करण्यात यावे अथवा समान काम समान वेतन मिळावे,  संसर्गजन्य रोगाच्या ठिकाणी काम करत असल्याने आम्हाला महिन्यातून आठवडा सुट्टी व्यतिरिक्त किमान चार पगारी सुट्ट्या मिळाव्या, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेडिक्लेम मिळावा कोविड व इतर आजारांचा संसर्ग झाल्यास बाहेरील हॉस्पिटल व सर्व वैद्यकीय खर्चाचा परतावा मिळावा. Indefinite Strike of Sai Sansthan Hospital Staff in Shirdi

अश्या स्वरूपाच्या मागण्या प्रामुख्याने या आंदोलनाच्या माध्यमातून रुग्णालय स्टाफ व नर्स यांनी रुग्णालय प्रशासन आणि साई संस्थांनकडे केल्या आहेत. 

Edited By - Krushna Sathe 
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com