कन्नडिगांना जरब बसवाच! पाहा पुन्हा काय घडलं?

कन्नडिगांना जरब बसवाच! पाहा पुन्हा काय घडलं?
Maharashtra-Karnataka dispute

महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा वादाचा वणवा पेटलाय.कन्नडिगांनी बेळगावातल्या मराठी पाट्यांना काळ फासलं आणि आंदोलनांचा भडका उडालाय. महाराष्ट्रातही या वादाचे पडसाद उमलेयत.

महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या धुपणाऱ्या जुन्या सीमावादात आता नव्या वादाची ठिणगी पडलीय. बेळगावात कन्नड फलकांसाठी तिथल्या कन्नड रक्षण वेदिका संघटनेने पुन्हा वळवळ सुरू केलीय. बेळगावात शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या गाडीवरच्या मराठी फलकाला या संघटनेनं काळ फासलंय. शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर कार्यालयात जात असताना कन्नड रक्षण वेदिकेनं हे पळपुटं आंदोलन करत पोबारा केलाय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सगळा राडा होत असताना, कर्नाटकचे पोलिस तोंडात मिठाची गुळणी घेऊन, हातावर हात ठेवून बघ्याच्या भूमिकेत होते. या फडतूस कन्नड रक्षण वेदिका संघटनेचा मराठीद्वेश लपून राहिलेला नाहीय. या संघटनेनं मराठी विरोधात अनेकदा वळवळ केलीय. आताच्या मराठी फलकांना काळ फासण्याच्या घटनेनंतर एक नवा व्हिडीओही समोर आलाय. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक मराठी भाषकाच्या तळपायाची आद मस्तकात गेल्यावाचून राहणार नाही.

या कन्नडिगांची मुजोरी इतक्या खालच्या पातळीला गेलीय की, त्यांनी बेळगावातील गावकरी हॉटेलच्या बोर्डाला काळं फासलंय. तेही एखाद्या दरोडेखोरांच्या टोळीनं घुसावं तसं. बेळगावात मराठी माणसांची आधीच गळचेपी सुरूय. त्यात आता कन्नड रक्षण वेदिकेनं केलेल्या डिवचा-डिवचीमुळे बेळगावसह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरलीय.

बेळगाव ही महाराष्ट्राची दुखरी नस आहे... बेळगावची जखम महाराष्ट्राच्या मनात कायमच ठसठसत आलरीय. आणि तिथला प्रत्येक मराठी माणूस महाराष्ट्रात येण्यासाठी तडफडतोय. मात्र, कर्नाटक सरकार आणि तिथल्या कन्नड रक्षण वेदिकेसारख्या किरकोळ संघटना मराठीजनांना त्रास देतायत. त्यामुळे, महाराष्ट्र सरकारने एकदाचा सोक्षमोक्ष लावावा आणि मराठीद्वेश करणाऱ्या या लुंग्या-सुंग्यांना कायमचा दडा शिकवायलाच हवा.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com