ओळखीचा वाढप्या अन् रेमडेसिव्हिरचा तुडवडा...लातुरकरांना आठवले विलासराव

ओळखीचा वाढप्या अन् रेमडेसिव्हिरचा तुडवडा...लातुरकरांना आठवले विलासराव
Vilasrao Deshmukh

लातूर : दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख Vilasrao Deshmukh हे त्यांच्या अनेक भाषणातून ‘वाढप्या ओळखीचा असला पाहिजे’, असे म्हणायचे. त्यांच्या या विधानाची मनातून आठवण सध्या लातूरकरांना Latur रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे येत आहे. Latur Residents remembered Vilasrao Deshmukh speech

जालना जिल्ह्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे Rajesh Tope यांनी दहा हजार इंजेक्शनच्या वाटपाला सुरुवात केली आणि लातूर जिल्ह्यात रेमडेसिव्हिरसाठी Remdisivir त्याच्या वापरावरच बोट ठेवले जात आहे. दरम्यान, जिल्ह्यासाठीही दहा हजार इंजेक्शन्सची नोंदणी केली असून लवकरच ते उपलब्ध होण्याची आशा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. Prithviraj b. P. यांनी व्यक्त केली आहे.

पंगतीत भोजन वाढणारा अर्थात वाढप्या ओळखीचा असल्यास तो कमी पडणार नाही, याची काळजी घेतो. याप्रमाणे सरकार दरबारी ओळखीची व्यक्ती असेल तर सरकारच्या विविध योजनांचा लाभ न मागताही होतो.याच पद्धतीने अनेक भाषणांतून विलासराव देशमुख हे वाढप्या ओळखीचा असला पाहिजे, याची जाणीव करून दिल्याने जिल्ह्याला न मागताही अनेक गोष्टी मिळतात, असे ते आवर्जून सांगत. त्यांच्या या वाक्याची लातूरकरांना Latur काही दिवसापासून सातत्याने आठवण येत आहे. जिल्ह्यात रेमडेसिव्हिरचा तुटवडा असताना तो कमी करण्यासाठी काहीच प्रयत्न होत नसल्याने लातूकरांना साहेबांच्या ‘त्या वाक्याची आठवण येत आहे. Latur Residents remembered Vilasrao Deshmukh speech

रुग्ण व त्यांचे नातेवाईक या इंजेक्शनसाठी रात्रंदिवस भटकंती करीत आहेत. विविध ठिकाणी वशिले लाऊन इंजेक्शन उपलब्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातच गुरुवारी जालना येथे आरोग्यमंत्री टोपे यांनी दहा हजार रेमडेसिव्हिरच्या वाटपाला सुरुवात केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

जालन्यासाठी Jalnaआरोग्य मंत्री राजेश टोपे हे ओळखीचा वाढप्या ठरले. लातूरकरांना मात्र, ओळखीचा वाढप्या नसल्याची खंत आहे. दरम्यान, गुरुवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख Amit Deshmukhयांनी आढावा बैठकीतूनच अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याशी मोबाईलवरून रेमडेसिव्हिर तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

Edited By- digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com