दंगल गर्ल गीता आणि बबीताच्या बहिणीने केली आत्महत्या आत्महत्येच कारण नक्की काय पाहुयात

दंगल गर्ल गीता आणि बबीताच्या बहिणीने केली आत्महत्या आत्महत्येच कारण नक्की काय पाहुयात
KUSTI PLAYER SUCIDE CASE

राज्यस्तरीय कुस्तीच्या अंतिम सामन्यात केवळ एका गुणाने झालेला पराभव सहन न झाल्याने रितिका फोगाटने आत्महत्या केली. दंगल गर्ल गीता आणि बबीता फोगाटची रितीका फोगटही मामेबहीण आहे रितिका फोगाट हिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिच्या आत्महत्येने कुस्ती क्षेत्रात खळबळ माजली आहे. कुस्ती क्षेत्रात फोगाट कुटुंबाने नाव कमावलं आहे मात्र रितिका फोगाटच्या आत्महत्येने फोगाट कुटुंबीयांना खुप मोठा धक्का बसला आहे.

रितिकाही 17 वर्षाचीच होती. रितिकालाही तिच्या बहिणी गीता आणि बबीता या स्टार कुस्तीपटूं सारखं कुस्तीपटू बनायचं होतं, त्यासाठी ती गेली 5 वर्षे तिचे मामा द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महावीर फोगट यांच्या अकादमीमध्ये सराव करत होती. तिने नुकतंच भरतपूरमधील लोहागढ स्टेडियममध्ये झालेल्या राज्यस्थरीय सब-ज्यूनियर आणि ज्यूनियर महिला आणि पुरुष कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत अंतिम सामन्यात रितिकाला एक गुण कमी मिळाल्याने तिचा पराभव झाला हा पराभव तिच्या जिव्हारी लागल्यानं तिला तो सहन झाला नसल्याने तिने सोमवारी रात्री खोलीतील पंख्याला ओढणी बांधून फाशी घेतली.

रितिकाच्या मृतदेहाचं पोस्टमॉटर्म रीपोर्ट आल्यानंतर पोलिसांनी मृतदेह तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला. रितिकाच्या मृतदेहाचे अंतिम संस्कार तिच्या गावी राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील जैतपूरमध्ये करण्यात आलं आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com