स्थानिक प्रशासनाने तत्परता दाखवत गरजू वृद्धेस दिला आधार

स्थानिक प्रशासनाने तत्परता दाखवत गरजू वृद्धेस दिला आधार
The local administration helped the needy

परभणी -  जिंतूर Jintur तहसील कार्यालयातील Tehsil Office सर्व अधिकारी टीमने एका बेघर, निराधार, व्ययस्कर आजीबाईस न्याय justice दिला आहे. तसेच तिच्यासाठी नियमात बसणाऱ्या शासकीय योजना government plan वेळीच मंजूर करून कमालीची तत्परता दाखवली आहे. (The local administration helped the needy)

तहसील कार्यालयातील तहसीलदार हरिकेशन सोनुने यांना हुतात्मा स्मारक परिसरात एक वयस्कर निराधार महिला आढळून आली. तेव्हा त्यांनी त्या वयस्कर महिलेची विचारपूस केली.  तेव्हा वच्छला नाथराव देवकर या महिलेचे कोणतेही नातेवाईक सांभाळ करत नाही अशी माहिती समोर आली. तेव्हा त्या महिलेस तत्काळ मदत मिळावी म्हणून तहसीलदार सखाराम मांडवगडे यांच्याशी चर्चा केली. 

हे देखील पहा - 

तसेच त्या महिलेस संजय गांधी निराधार योजने अंतर्गत 1000 रु पेंशन, अंत्योदय योजनेचे दरमहा 35 किलो धान्य आणि मोफत शिवभोजन योजनेचा लाभ तत्काळ मिळवून दिल्याची माहिती तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी दिली आहे. 

या सर्व सत्कार्यात तहसीलदार कांबळे, पुरवठा विभागाचे तहसीलदार यादव आणि मंडळ अधिकारी प्रशांत राखे यांनी पुढाकार घेतला होता. तसेच एका निराधार वृद्ध महिलेस शासकीय योजनेचा लाभ तत्काळ मिळवून दिल्याबद्दल नागरिकांनी प्रशासनाचे कौतुक केले आहे.

Edited By - Puja Bonkile 


 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com