छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या धेंड्यांची मस्ती कायद्याने उतरवायलाच हवी

छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या धेंड्यांची मस्ती कायद्याने उतरवायलाच हवी

आता बातमी प्रत्येकाच्या तळपायाची आग मस्तकात घेऊन जाणारी कारण, महाराष्ट्राचं आराध्यदैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा  एकेरी उल्लेख करत थट्टा उडवली गेलीय. महाराष्ट्राच्या पेशीपेशीमध्ये वाहणाऱ्या शिवराय नावाच्या ऊर्जेची थट्टा कुणी केलीय? काय घडलंय नेमकं... पाहूयात.

हे अकलेचे तारे तोडलेत अग्रिमा जोशुआनं, स्टॅण्डअप कॉमेडियन म्हणून ती मिरवत असते. तिने नुकताच एका कार्यक्रमात निर्लज्जपणाचा कळस गाठलाय. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख तिनं केलाय. इतकंच नाही तर, अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या छत्रपतींच्या भव्य स्मारकाचीही तिने थट्टा केलीय. आणि हे सर्व करताना समोर बसलेले बिनडोक श्रोतेही निर्लज्जपणे फिदीफिदी दात काढत होते.

अग्रिमानं माकडचाळे केल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळलीय. मनसेनं तर हा कार्यक्रम जिथं झाला तिथं धडक मारून जाब विचारला. मनसैनिक इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी स्टुडिओत खळ्ळखट्याक करत तोडफोडही केलीय. शिवरायांवर प्रेम करणारा प्रत्येकजण खवळून गेलाय. 

प्रकरणाचं गांभीर्य ओळखून गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी चौकशीचे चौकशीचे आदेश दिलेत.

आता आणखी एक अकलेचा कांदा बघा. याच्या सडक्या मेंदूतून काय बाहेर पडलंय तेही बघा. या महामुर्खाचं नाव आहे सौरव घोष....यानेही छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करत वादग्रस्त वक्तव्य केलंय. अग्रिमा जोशुआ असो किंवा सौरव घोष... या दोघांच्याही अकलेची दिवाळखोरी आता उघडी पडलीय. छत्रपतींचा इतिहास, त्यांचं शौर्य माहित नसेल तर कायद्याचा बडगा त्यांच्यावर उगारलाच पाहिजे. कॉमेडी आणि माकडचाळे यातला फरक अग्रिमा जोशुआ आणि सौरव घोषला नीट समजून सांगायला हवा. त्यासाठी त्यांच्यावर कडक कारवाई करायलाच हवी. कारण,  काहीही झालं तरी कायद्याचं स्वराज्य स्थापन करणाऱ्या शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे.
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com