राम मंदिराच्या भूमिपूजनासाठीचा मुहूर्त अशुभ - शंकराचार्य बरसले

राम मंदिराच्या भूमिपूजनासाठीचा मुहूर्त अशुभ - शंकराचार्य बरसले

5 ऑगस्टला पंतप्रधान मोदी अयोध्येत राममंदिराचं भूमिपूजन करणार आहेत. पण यासाठी जो मुहूर्त निवडण्यात आलाय, त्यावरून आता राजकारण रंगू लागलंय.

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनासाठी 5 ऑगस्टचा मुहूर्त निवडण्यात आलाय पण आता या मुहूर्ताच्या वेळेवरुन वाद निर्माण व्हायला सुरुवात झालीय. शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वतींनी भूमिपूजनासाठी निवडलेला मुहूर्त अशुभ असल्याचं म्हटलंय. यापूर्वी त्यांचे शिष्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींनी आपल्या फेसबुक पेजवर भूमिपूजनासाठीची तारीख अशुभ असल्याचं म्हटलं होतं.

भूमिपूजनाच्या मुहूर्तावरुन वादंग 

  • दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी असणारा अभिजित मुहूर्त भूमिपूजनासाठी निवडण्यात आलाय.
  • हा शुभमुहूर्त भारतीय ज्योतिषशास्त्रात उत्तर दक्षिणेतील संगमातून काढलाय. 
  • उत्तर भारतात ५ ऑगस्टला भाद्रपद तर दक्षिण भारतात श्रावण महिना आहे. 
  • मात्र शंकराचार्य सरस्वतींपासून अनेकांनी अभिजित मुहूर्ताला विरोध केलाय.
  • भाद्रपदात गृह, मंदिरारंभ कार्य निषिद्ध असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.
  • मुहूर्त अशुभ आहे यासाठी विष्णु धर्म शास्त्र आणि नैवज्ञ वल्लभ ग्रंथाचा संदर्भ दिला गेलाय.

राम मंदिराच्या न्यायालयीन लढाईपासूनच अनेक मतभेद विविध हिंदू संघटना आणि आखाड्यांमध्ये आहेत. आताही मुहूर्तावरुन हिंदू आखाड्यांमध्ये मतभेद निर्माण झालेत. अर्थात यापूर्वीही रामाप्रती असणाऱ्या श्रद्धेपोटी मतभेद विसरुन एकीचं दर्शन झालं. त्यामुळे मुहूर्तावरुन निर्माण झालेला लवकरच निवळेल यात शंका नाही.
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com