टिकटॉकला बंदी घातल्यानंतर भारतात पुन्हा प्रवेश करण्यासाठी टिकटॉकच्या हालचाली

टिकटॉकला बंदी घातल्यानंतर भारतात पुन्हा प्रवेश करण्यासाठी टिकटॉकच्या हालचाली

भारतात बंदी आल्यानंतर चिनी कंपनी TikTok ने भारतात पुन्हा प्रवेश करण्यासाठी हालचालींना सुरूवात केलीय. TikTok ने आपल्यावरचा चिनी कंपनी हा शिक्का पुसून देण्यासाठी योजना तयार केलीय.

टिकटॉकचं मुख्यालय चीनऐवजी लंडनमध्ये उभारावं यासाठी TikTok कंपनी गेल्या काही महिन्यांपासून ब्रिटनशी चर्चा करतेय. लंडनमध्ये मुख्यालय उघडून विरोधकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं नियोजन चीनतर्फे सुरू आहे. चीनपासून दूर राहण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. मुख्यालयासाठी कंपनीने अनेक ठिकाणे पाहिली आहेत. त्यापैकी लंडन हे एक आहे.

मात्र, अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नसल्याची माहिती सुत्रांनी दिली. या वर्षाच्या सुरुवातीला टिकटॉकने कॅलिफोर्नियाच्या वॉल्ट डिस्नेचे एक माजी एक्झिक्युटीव्ह केविन मेयर यांना टिकटॉकच्या मुख्य एक्झिक्युटीव्हपदी नियुक्त केलं होतं. केविन हे अमेरिकेचेच नागरिक आहेत. 

भारतानंतर अमेरिकेनंही चिनी अॅप बंदीवर विचार सुरु केलाय. असाच विचार अनेक देशही करताहेत. हेच पाहता आता कंपनीनं चीनशी संबंध तोडण्याचा. आणि स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केलाय.आणि मुख्यालय भारताबाहेर हलवणं त्याचा मुख्य भाग असल्याचं बोललं जातंय.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, आम्ही ग्राहकांच्या सुरक्षिततेबद्दल कटीबद्ध आहोत, टिकटॉक असा मंच आहे जिथं नवीन कलाकारांना संधी मिळते, आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळतो. यातून जगभरातल्या लाखो लोकांना आनंद मिळतो. त्यामुळंच आम्ही ग्राहक, कलाकारांचे अधिकार आणि सुरक्षितता अबाधित निर्णय घेऊ

टिकटॉकवर चिनी सरकारसोबत युजरचा डेटा शेअर करण्याचे अनेक आरोप झालेत. मात्र, भारतानं यावर थेट कारवाई करत टिकटॉक बॅन केलंय..यानंतर आता अनेक देशात हे अॅप बॅन होऊ शकतं असं कंपनीला वाटतंय. म्हणून चीनशी संबंध तोडून स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण करण्याचा निर्णय कंपनी प्रशासनाकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. असं झालं तर चिनी सरकारला हा मोठा झटका असेल.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com