Mothers Day आई म्हणुन जबाबदारी पार पाडताना 'तिने' कर्तव्यही बजावले चोख!

Mothers Day आई म्हणुन जबाबदारी पार पाडताना 'तिने' कर्तव्यही बजावले चोख!
Story of a Nurse in Pune District who attended job on fourt day after Delivery

पुणे : कोरोना Corona महामारीच्या लढाईत कुटुंब व 4 महिन्याच्या बाळाची Child काळजी घेत तीचा मातृत्वाचा Mother आणि रुणसेवेचा Patient ध्यास सुरुच आहे.आई म्हणुन कर्तव्य तर बजावले मात्र पालक Parent म्हणुन रुग्णांच्या सेवेतही कुठलीही कमतरता ठेवली नाही. Mothers Day Special Story of a Nurse in Pune District

पुणे जिल्ह्यातील शेलपिंपळगाव येथील आरोग्य केंद्रातील Health Center आरोग्य सेविका शोभा दौंडकर गेले अनेक दिवसांपासून ह्या शेलपिंपळगाव आरोग्य केंद्राच्या मार्फत रुग्णांना सेवा देत आहेत. गरोदर Pregnant असतानाही सुट्टी न घेता प्रसूती होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत त्या कोरोना महामारीत रुग्णांना सेवा देत होत्या. डिलिव्हरी झाल्या नंतर थोडेच दिवस विश्रांती करून त्या आपल्या 4 महिन्याच्या बाळाला घरी ठेऊन पुन्हा कामावर रुजू झाल्या. 

हे देखिल पहा - 

आई Mother म्हणुन जबाबदारी बजावत असताना कर्तव्यात Duty कमी न पडण्याचा त्यांचा ध्यास कामातुन दिसुन येतोय. घरचे सगळे कामावर जाण्यास विरोध करत असतानाही त्यांना समजावून स्वतःची जबादारी पार पाडण्यासाठी त्या कामावर रुजू झाल्या. Mothers Day Special Story of a Nurse in Pune District

शोभा ज्या दिवसापासून रुजू झाल्यात त्या दिवसापासून आजपर्यंत त्यांनी एकही सुट्टी घेतलेली नाही. त्यांच्या मनात भीती होती की, बाळाला काही त्रास तर होणार नाही ना मात्र असे अनेक प्रश्न शोभा सिस्टर भोवती गिरक्या घेत आहेत. मात्र इतके दिवस काम करूनही जे मानधन दिले जाते ते ही तुटपुंजे असल्याने घर चालवायचं कसं असाही प्रश्न त्यांना पडतो. शासनाने आरोग्य सेविकांना कायमस्वरूपी Permanent कामावर रुजू करून घेतले पाहिजे असे त्यांच्यासह सर्वच आरोग्य सेविकांचे मत आहे.

Edited By - Krushna Sathe 


 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com