मंत्रालय मुंबईबाहेर हलवण्यासाठी हालचाली, या ठिकाणांचा विचार...

मंत्रालय मुंबईबाहेर हलवण्यासाठी हालचाली, या ठिकाणांचा विचार...

भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढतच चाललाय.  देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 6,566 रुग्ण वाढले असून 194 लोकांचा बळी गेलाय. तर देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 58 हजार 333 इतका झालाय. सध्या भारतात कोरोनामुळे  4 हजार 531 लोकांचा मृत्यू झाला असून 86 हजार 110 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 67 हजार 749 रुग्ण पूर्णपणे बरे झालेत,  अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलीय. राज्यात काल 2 हजार 190 कोरोनारुग्णांची नोंद झालीय. त्यामुळे राज्यातला कोरोनाबाधितांचा आकडा आता 56 हजार 948 इतका झालाय.

कोव्हिडच्या वाढच्या प्रादूर्भावामुळे शासकीय कामकाज ठप्प झालंय. भविष्यात मुंबईत कोरोनाचा प्रभाव कितपत वाढेल याबाबतही अनिश्चितता आहे. त्यामुळे शासकीय कामकाजाला गती देण्यासाठी, राज्य शासन मंत्रालय तात्पुरत्या स्वरुपात अन्यत्र हलवण्याचा विचार सुरू झालाय. त्यासाठी नागपूर, लोणावळा आणि नाशिक जिल्ह्याचा विचार सुरू असल्याची माहिती आहे.

संपूर्ण मंत्रालय हलवण्याऐवजी आरोग्य, वित्त पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा, नगररचना, शिक्षण, गृह यांसारखे विभाग हलवून कामकाज केला जाणार असल्याची माहिती आहे.

बुधवारी राज्यात 964 कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेलेत. आतापर्यंत 17 हजार 918 रुग्ण घरी गेलेत. मात्र, राज्यात गेल्या 24 तासात 105 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय.. भारतातील कोरोना मृतांची संख्या जुलै महिन्यात 10 हजारापर्यंत जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. साथरोग आणि सार्वजनिक आरोग्य तज्ञ प्रा. डी. प्रभाकरन यांनी ही माहिती दिली आहे. सध्या जी वेगवेगळी प्रारूपे सादर करण्यात आली आहेत त्यावरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. भारतात रुग्णांची संख्या 4 ते 6 लाख राहील त्यात मृत्युदर 3 टक्के राहील असा त्यांनी अंदाज व्यक्त केलाय.

देशात लवकरच पाचवा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. चौथ्या लॉकडाउनच्या काळात देशभर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालल्याने. लॉकडाऊन आणखी पंधरा दिवस वाढवला जाणार असल्याची चिन्हं आहेत. स्वत: पंतप्रधान मोदी रविवारी याची घोषणा करणार असल्याची माहिती आहे. चौथ्या लॉकडाउनच्या काळात रुग्णसंख्या खूपच वाढली आणि ती आता दीड लाखावर गेली आहे. त्यातच लाखो स्थलांतरित मजूर मोठ्या शहरांतून आपापल्या गावी जात असून, त्यांच्यापैकी अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यापासून संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळे लॉकडाउन वाढविला जाईल, असे दिसत आहे. दरम्यान, केंद्रीय सचिंवाची आज बैठक पार पडणार आहे. या बैठकीत सर्व राज्यातील सचिव आणि महत्वाच्या शहरातील आयुक्तही सहभागी होणारेत. 

त्यामुळेच मंत्रालय मुंबईबाहेर हलवण्याचा विचार सुरु आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com