महावितरण विभाग - अपूर्ण बिले भरल्याने एक महिन्यापासून शेतकऱ्यांना वेठीस धरले

महावितरण विभाग - अपूर्ण बिले भरल्याने एक महिन्यापासून शेतकऱ्यांना वेठीस धरले
MSEDCL - Paying incomplete bills has been holding farmers hostage for over a month

नंदुरबार - नंदुरबार तालुक्यातील भालेर गावात गेल्या एक महिन्यापासून ट्रांसफार्मर जळाल्याने विदुयत  पुरवठा खंडी झाला आहे. त्यामुळे  शेतकरी हवालदिल झाले आहेत. महावितरण विभागाकडे वारंवार मागणी केली आहे. तरीसुद्धा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी महावितरण विभाग शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे. MSEDCL - Paying incomplete bills has been holding farmers hostage for over a month

हे देखील पहा - 

आधी बिल भरा मग ट्रांसफार्मर देऊ असं महावीतरण अधिकारी  जी.बी. पाटील यांनी सांगितले आहे. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची झाली आहे. आम्ही संपूर्ण बिल भरू शकत नाही 50% बिल आम्ही भरलं आहे, त्वरित ट्रांसफार्मर बसवावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

परंतु महावितरण विभागाचे अधिकारी ऐकायला तयार नाहीत, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन केल आहे. या आंदोलना दरम्यान शेतकरी संतप्त झाल्याने पोलिसांना पाचारण करावं लागलं आहे. 

संपूर्ण बिल भरणा करण्यास शेतकरी समर्थ नाही. त्यामुळे आम्हाला सवलत देऊन त्वरित ट्रान्सफॉर्मर बसवून वीजपुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

Edited By - Puja Bonkile 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com