भोकरदनमध्ये जुन्या वादातून मेहुण्याने साल्याचे अपहरण करून केली हत्या

भोकरदनमध्ये जुन्या वादातून मेहुण्याने साल्याचे अपहरण करून केली हत्या
jalna

जालना : जुन्या घरघुती वादातून Disputes मेहुण्याने सख्ख्या साल्याचे अपरात्री चारचाकी वाहनातून अपहरण Kidnap करुन त्याची हत्या Murder केली आहे. ही घटना २९ मे रोजी भल्या पहाटे भोकरदन Bhokardan तालुक्यातील चांदई एक्को फाट्यावर घडली आहे. Murder Of One In Bhokardan Due To Old Dispute

गजानन सोनवणे असं हत्या करण्यात आलेल्या २२ वर्षीय तरुणाचं नाव आहे. बाबासाहेब उर्फ प्रकाश पंढरीनाथ मिसाळ,लक्ष्मण इंगळे,करण हाराळ अशी हत्या करणाऱ्या तिन्हीही आरोपींची Accused नावे आहेत.

२९ मे रोजी गजानन हा चांदई येथील त्याच्या घरासमोरील बाजेवर झोपलेला असताना तिन्हीही आरोपींनी त्याला भल्या पहाटे सकाळी साडेचार वाजेच्या दरम्यान चारचाकी वाहनातून उचलून नेऊन अपहरण केले आणि लोखंडी गजासारख्या धारदार शस्त्रांनी त्याच्या दोन्ही हातासह दोन्ही पायांवर बेदम मारहाण केली. Murder Of One In Bhokardan Due To Old Dispute

या मारहाणीतच त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष घोडके, ए. जी.पाटोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, इंदलसिंग बाहुरे,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, सुभाष भुजंग,अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

घटनेचा पंचनामा करून तपासाला वेग दिला असता ही हत्या जुन्या वादातून झाली असल्याचे निष्पन्न झाले. अखेर या हत्या प्रकरणातील आरोपी बाबासाहेब उर्फ प्रकाश पंढरीनाथ मिसाळ,लक्ष्मण इंगळे,करण हाराळ यांचा तातडीने शोध घेऊन पोलिसांनी त्यांना अवघ्या ३ तासांतच जेरबंद केलं आहे. Murder Of One In Bhokardan Due To Old Dispute

हसनाबाद पोलिसांनी Police दाखवलेल्या तत्परतेमुळे तिन्हीही आरोपी अवघ्या ३ तासांतच जेरबंद झाल्याने हसनाबाद Hasnabad पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Edited By : Krushnarav Sathe 

हे देखील पहा -

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com