दोषींना फाशी दिल्यानंतर निर्भायाची आई म्हणाली ....  

 दोषींना फाशी दिल्यानंतर  निर्भायाची आई म्हणाली ....  

नवी दिल्लीः  आजचा दिवस हा देशभरातील मुलींच्या नावे. न्यायालय आणि सरकारचे आम्ही आभार मानतो, असं आशी भावना आशा देवी यांनी व्यक्त केली.
 निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना फाशी दिल्यानंतर तिची आई आशा देवी या भावुक झाल्या. अखेर चौघा दोषींना फाशी दिली गेली. आमच्यासाठी हा मोठा संघर्ष होता. त्याला अखेर यश आलं. उशिरा का होईना माझ्या मुलीला न्याय मिळाला.
मुलींवर आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना इतकी गंभीर शिक्षा होते हे बघितल्यानंतर आता मुलांचे आई-वडील त्यांना चांगले संस्कार घडवतील, अशी अपेक्षा आशा देवी यांनी व्यक्त केली. निर्भयाच्या नराधमांना फाशी दिल्यानंतर महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. 
मी माझ्या मुलीला वाचवू शकले नाही. ती असती तर मी आज एका डॉक्टरची आई असती. माझ्या मुलीवर मला गर्व आहे. सुप्रीम कोर्टातून आले आणि तिच्या फोटो समोर हात जोडले. बेटा तुला आज न्याय मिळाला, असं आशा देवी म्हणाल्या.

मोठ्या संख्याने लोक आणि कार्यकर्ते तिरुंगाच्या बाहेर जमले होते. निर्भयाला न्याय मिळाला आता प्रत्येक मुलीला न्याय मिळेल, अशी आशा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
तिहार तुरुंगाबाहेर जमलेल्या महिला अधिकार संघटनांच्या कार्यकर्त्यांनी नराधमांना फाशी दिल्यानंतर आनंद व्यक्त केला. 


 

Web Title : Nirbhaya's mother said after hanging the guilty ...


 

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com