IT कंपन्यांचा परदेशातील व्यवसाय मंदावला
IT business slowed down

IT कंपन्यांचा परदेशातील व्यवसाय मंदावला

कोरोनाचा फटका सेवा क्षेत्राला बसलाय. सेवा क्षेत्रात बँकिंग आणि आयटी क्षेत्राचा समावेश होतो. या क्षेत्रालाही राज्य सरकारच्या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

कोरोनाचा सेवा क्षेत्राला मोठा फटका बसला. सेवा क्षेत्रात आयटी आणि बँकिंग सेक्टरला मोठा वाटा आहे. आयटी सेक्टर कोरोनामुळं बऱ्याच प्रमाणात बाधित झालं. आयटी कंपन्यांना परदेशातील कामं कमी मिळाली. याचा परिणामी कर्मचारी कपात करण्यात आली. येत्या काळात आयटीत नव्या नोकरीच्या संधीही कमी असणार आहेत 

आयटी सेक्टरला चालना देण्यासाठी सरकारनं विशेष पॅकेज द्यावं  अशी मागणी होतेय.

 इतर उद्योगांएवढा फटका आयटी सेक्टरला बसला नाही. पण एकूणच सेवा क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकार काही तरी नव्या घोषणा करेल याकडं संपूर्ण सेवा क्षेत्राचं लक्ष लागलंय.
शैलेश जाधवसह गोपाल मोटघरे साम टिव्ही पिंपरी चिंचवड

 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com