लातुरात ऑक्सिजनची आणीबाणी: ह्याची जबाबदारी कोणाची ?

 लातुरात ऑक्सिजनची आणीबाणी: ह्याची जबाबदारी कोणाची ?
oxygen cylinder news

लातूर: लातूर Latur जिल्ह्यात कोव्हीड रुग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ होत आहे. जिल्ह्यात 16 हजार पेक्षा जास्त रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. यातील अनेक रुग्ण अत्यवस्थ आहेत. जिल्ह्यातील 40 पेक्षा जास्त खासगी रुग्णालय भरलेले आहेत. येथे हजारो रुग्ण आहेत.  मात्र आता ऑक्सिजन बेड मिळत नसल्यामुळे संपूर्ण यंत्रणा हतबल आहे. लातूर शहरातील बार्शी रोड वरील आयकॉन हॉस्पिटलचे डॉक्टर प्रमोद घुगे आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी  रस्त्यावर ठिय्या Agitation मांडला आहे. जर ऑक्सिजन बेड  मिळाले नाहीतर तर रुग्ण सिविलला पाठवून मी दवाखाना बंद करतो.  ह्या भूमिकेत आता डॉक्टर आले आहेत. Oxygen emergency in Latur

लातूर शहरातील खाजगी आयकॉन कोव्हीड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजनवर असलेले रुग्ण इतरत्र हलविण्यास सांगितले आहे. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी काही काळ लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन केलं . याविषयी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ऑक्सिजन नसल्यामुळे नाईलाजास्तव रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय किंवा इतर रुग्णालयात हलविण्यास सांगितल्याचे स्पष्ट केले आहे.

दिवसाला १५० ते २०० सिलेंडर ऑक्सिजनची हॉस्पिटलला गरज असते. मात्र जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांना पाठपुरावा करूनही ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याचे हॉस्पिटल प्रशासनाचे म्हणणे आहे. गेल्या  काही दिवसांपासून ऑक्सिजन पुरवठा करणारी एजन्सी तुटवड्यामुळे ऑक्सिजन पुरवठा गरजेपेक्षा कमी करीत आहे. तर यावर संतप्त रुग्णांच्या नातेवाईकांनी मोठा रोष व्यक्त केला आहे.

Edited By- Sanika Gade

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com