पंकजा मुंडेंकडून शरद पवारांचं कौतूक! पंकजा मुंडेंच्या ट्विटमुळे राजकीय चर्चांना उधाण

पंकजा मुंडेंकडून शरद पवारांचं कौतूक! पंकजा मुंडेंच्या ट्विटमुळे राजकीय चर्चांना उधाण

भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी ट्विट करुन शरद पवारांचं कौतुक केलंय. पंकजांच्या ट्विटमुळे राजकीय पटलावर चर्चेला उधाण आलंय. पंकजांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय? 

पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांचं ट्विट करुन कौतकु केलंय. पंकजांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. त्याचं झालं असं की ऊस तोडणी कामगारांच्या मजुरीत वाढ करण्याच्या विषयावर वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट इथं बैठक आयोजित करण्यात आली होती. शरद पवार यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक पार पडली. शरद पवार यांनी या बैठकीत सकारात्मक तोडगा काढला. पवार यांच्या भूमिकेचं पंकजा मुंडे यांनी ट्विट करत कौतुक केलं. 

वाचा काय म्हणाल्या पंकजा मुंडे -

hats off ... कोरोनाच्या परिस्थितीत इतका दौरा , आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिना चे अप्रूप वाटले ... पक्ष ,विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबानी शिकवले आहे

असं म्हणत शरद पवार यांच्या कामाबद्दल आदर व्यक्त केलाय.

पंकजा मुंडे यांच्या या ट्विटलाच उत्तर देताना रोहित पवारांनी त्यांचे आभार मानले आहेत. तसंच, त्यांच्यातील या खिलाडूवृत्तीचं कौतुकही केलंय. 'राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे' असं रोहित पवार यांनी म्हटलंय. 

विधानसभेतील पराभवापासून पंकजा मुंडे भाजपत नाराज असल्याची चर्चा आहे. एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर काहीच दिवसात पंकजांनी शरद पवारांचं उघडपणे कौतुक केलंय. त्यामुळे राजकीय पटलावर चर्चांना उधाण आलंय.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com