विद्यार्थ्यांच्या फसवणूक प्रकरणी पालक आणि ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

विद्यार्थ्यांच्या फसवणूक प्रकरणी पालक आणि ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
dombivali school.jpg

डोंबिवली : खिडकाळी येथील सीताबाई के. शहा मेमोरिअल या शाळेत राज्यमंडळ अभ्यासक्रम बंद करुन सीबीएसई मंडळाच्या अभ्यासक्रमाशी संलग्नित अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेशाची सक्ती केली जात आहे. याला पालकांचा विरोध आहे, तसेच 8 वी ते 10 वी ची मान्यता नसतानाही हे वर्ग सुरु करुन शाळेने विद्यार्थ्यांची पालकांची फसवणूक केली असून शाळेविरोधात शिक्षण मंडळाने योग्य ती कारवाई करीत 450 विद्यार्थ्यांना शैक्षणिक न्याय मिळवून द्यावा अशी मागणी पालकांनी केली आहे. (Parents and villagers have warned of agitation in the case of cheating students) 

त्यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी याचा पाठपुरावा केला आणि सिताबाई शाह मेमेरिअल शाळेला शाळा सुरू ठेवण्याचे आदेश ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांनी दिले आहेत.तरी ही शाळा बंद करण्याचा घाट शाळेच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाने केला आहे. आता या विरोधात खिडकाळी गावचें ग्रामस्थ आणि पालक संघटना चांगलेच आक्रमक झाले आहेत. या बाबत त्यांनी बैठक घेत एक मताने शाळे विरोधात लढा देण्याचे ठरवले आहे.आम्हाला सी.बी.एस.सी.अभ्याक्रम नको असून आम्हाला राज्य मंडळ संलग्न अभ्यासक्रम हवा आहे आणि शाळा त्वरित सुरू करा अशी मागणी ग्रामस्थ आणि पालकांनी केली आहे. जर शाळा सुरू केली नाही तर येत्या महिना भरात खिडकाळी गावातील रिव्हरव्ह्यूड पार्कच्या गेटवर मुलांची शाळा चालवत अनोखे आंदोलन करणार असल्याचा इशारा पालक ,ग्रामस्थ आणि ठाणे महापालिकेचे नगरसेवक बाबाजी पाटील यांनी दिला आहे.

Edited By- Anuradha Dhawade 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com