गाईंचे अवैधरित्या वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात

गाईंचे अवैधरित्या वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात
Police nab four suspects suspected of transporting animals illegally

धुळे -  धुळे शहरालगत असलेल्या मुंबई - आग्रा महामार्गावर मोहाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी पेट्रोलिंग करत होते. तेव्हा त्यांना दोन व्यक्ति  चार चाकी मोठी वाहन संशयास्पदरित्या अधिकाऱ्यांना आढळून आले होते. त्यामुळे या दोन्ही वाहनचालकांना वाहने रस्त्याच्या बाजूला थांबविण्यासाठी सांगण्यात आले होते. त्यानंतर वाहन चालकास वाहनांमध्ये कसली वाहतूक केली जात आहे, असे विचारण्यात आले होते. Police arrested for illegally transporting cows

ही देखील पहा - 

वाहनचालकांकडून उडवा उडवीची उत्तरे पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर पोलिस अधिकार्‍यांचा संशय बळावल्याने पोलिसांनी तात्काळ या दोन्ही वाहनांची तपासणी केली आहे. यामध्ये गाई अवैधरित्या कोंबून वाहून नेली जात आहे, अशी माहिती समोर आली . 


या दोनही वाहनातून तब्बल 27 गाई मोहाडी पोलिसांनी जप्त केल्या आहे. यामध्ये दोन वाहन तसेच चार आरोपीच्या देखील पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. 

यासंदर्भात ताब्यात घेतलेल्या चारही जणांची कसून  चौकशी केली जात आहे. ही जनावरे कुठून व कशाच्या उद्देशाने वाहून नेली जात होती याबाबत पुढील तपास मोहाडी पोलिस करीत आहेत.

Edited By - Puja Bonkile 
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com