अमेरिकेतील फॅशन वर्डच्या "क़्वीन" चे या आजारमुळे निधन

अमेरिकेतील फॅशन वर्डच्या "क़्वीन" चे या आजारमुळे निधन
Gia Carangi

देशात आणि जगभरात एड्स AIDS या आजारांबद्दल जनजागृती करण्याचे काम सुरू आहे. या भयानक आजाराने अनेकांचे प्राण घेतले आहे. अमेरिकेतील फॅशन वर्डची "क्वीन"  Queen म्हणून ओळखली जाणारी जिया सारंगी Gia Carangi हिचे 27 वर्षाची असतांना एड्स AIDS या आजारमुळे निधन झाले. जिया सारंगीला मॉडेलिंग वर्ल्डची "क्वीन" "Queen" of the modeling world मानली जात होती.  तिचा जन्म 29 जानेवारी 1960 रोजी फिलाडेल्फिया येथे झाला होता. तिचे वडील एक रेस्टॉरंटचे मालक होते यांनी आई गृहिणी होती. जिया 11 वर्षांची होती तेव्हा तिच्या आईवडीलांचा घटस्फोफ्ट झाला. (The "Queen" of the American fashion ward has died of the disease)

हे देखिल पहा - 

आई - वडिलांच्या घटस्फोटानंतर जिया आपल्या वाडीलांसोबत राहायला गेली. ती वडिलांना त्यांच्या कामात मदत करत होती. वयाच्या 16 व्या वर्षी तिने मॉडेलिंगच्या क्षेत्रात पदर्पण केले. 1976 कहा उन्हाळा होता. त्यावेळी मॉडेलिंगच्या जगात सोनेरी केस असलेल्या मॉडेल्सने भरलेले होते. तेव्हा जियाच्या रूपाने या क्षेत्राला एक नवा चेहरा मिळाला. 

जेव्हा सारंगीने मॉडेलिंगच्या क्षेत्रात पाऊल ठेवले तेव्हा तिचा चेहरा खरोखरच नवीन चेहरा होता. तिने स्वत:ला मेकअपविना लोकांसमोर ठेवले. ती अमेरिकेच्या सुपर मॉडेल्सपैकी एक बनली. प्रत्येकजण तिची एक झळ पाहण्यासाठी आतुर असे. तसेच प्रत्येक मुलीला तिच्यासारखे व्हायचे होते. वयाच्या 18 व्या वर्षी, जिया सारंगी सर्वात अधिक पैसे कमवणारी मॉडेल बनली. त्यावेळी तिचे वार्षिक कमाई दहा लाख डॉलर्स होती. याच कारणांमुळे फॅशन जगात तिला जगातील पहिली सुपर मॉडेल मानतात.  

सारंगीच्या तेजस्वी व्यक्तिमत्वामुळे लोक तिच्याकडे आकर्षित झाले. परंतु लहान वयातच तिला ड्रग्सचे व्यसन लागले आणि हळूहळू तिच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली. 1981 मध्ये ड्रग्स घेऊन ड्रायव्हीग केल्याच्या आरोपाखाली तिला अटक करण्यात आली होती. 1985 मध्ये तिला न्यूमोनियामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा डॉक्टरांना तिच्या शरीरात एचआयव्ही विषाणू आढळला. त्यामुळे काही वर्षानंतर म्हणजे 18 नोव्हेंबर 1986 रोजी तिचे निधन झाले. तिच्या निधनाची बातमी फॅशन क्षेत्रात कोणालाकहा कळवण्यात आले नव्हते. त्यामुळेच तिच्या अंत्यदर्शनास कोणीच उपस्थित नव्हते. एकेकाळी मॉडेलिंगच्या जगावर राज्य करणार्‍या जियाला असे दुर्दैवी मृत्यू आला. जियाच्या आयुष्यावर एक चित्रपट देखील तयार करण्यात आला होता.  या चित्रपटात अँजेलीना जोलीने तिची भूमिका साकारली होती.

Edited By - Puja Bonkile
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com