बारामतीचा रिक्षावाला लावणीसम्राट

बारामतीचा रिक्षावाला लावणीसम्राट
Rickshaw driver Lavani Samrat

आठवड्याभरापासून रिक्षास्टँडवरचा लावणी सम्राटाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडिओतला रिक्षावाला साम टीव्हीनं शोधून काढलाय. कुठला आहे रिक्षावाला 

लावणी ही नृत्यकला फक्त महिलांपुरती मर्यादित नाही हे बारामतीच्या बाबजी यांच्या पदलालित्याकडं पाहून लक्षात येतं. गेल्या काही दिवसांपासून बारामतीच्या बाबजी कांबळे यांच्या लावणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. बाबजीच्या व्हिड़िओवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय.  रिक्षास्टँडवरची ही लावणी आज प्रत्येकाच्या मोबाईलवर आहे. साम टीव्हीनं या व्हायरल व्हिडिओच्या आधारे बाबजींचा शोध घेतला. तेव्हा बाबजी हे बारामतीत रिक्षाचालक असल्याची माहिती मिळाली.

 बाबजी हे कलाकार आहेतच पण बारामतीचे आहेत त्यामुळं राजकारणही त्यांच्या रक्तात आहे. गुणवडी गावचे ते ग्रामपंचायत सदस्य आहेत. बाबजींच्या विनोदबुद्धीनं त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे.

 बाबजींची ही कला एखाद्या मुरब्बी लावणी साम्राज्ञीला आव्हान देणारी आहे. त्यांच्या रुपानं महाराष्ट्राला नवा लावणीसम्राट मिळालाय.
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com