...सलनाम खानने 'या' कारणासाठी मागितली थिएटर चालकांची माफी!

...सलनाम खानने 'या' कारणासाठी मागितली थिएटर चालकांची माफी!
Salman khan

मुंबई : राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई सिनेमागृहात रिलीज होणार नाही. राधे यांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन शून्य Zero होईल, असे सांगत स्वतः सलमान खान Salman Khan याने चित्रपगृह चालकांची माफी मागितली आहे. Salman khan Radhe movie box office collection will be Zero

सलमान खान आपला आगामी चित्रपट ‘राधेः युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ Radhe: Your Most Wanted Bhai रिलीजसाठी उत्सुक आहे. ईदच्या Eid दिवशी हा चित्रपट प्रदर्शित करण्याच्या आपल्या चाहत्यांशी केलेल्या प्रॉमिसची पूर्तता करत, Zee ५ च्या पे-पर -व्ह्यू सर्व्हिस Zee’s pay-per-view service, झी प्लस वर १३ मे रोजी चित्रपट पाहू शकतील, असे सलमानने जाहीर केले आहे.

हे देखिल पहा- 

मात्र यामुळे चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन Box office Collection शून्य Zero होणार असल्याने अभिनेत्याने थिएटर मालकांची माफी मागितली आहे. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार नाही. कारण कोरोनाव्हायरस मुळे देशभरातील बहुतेक सिनेमा गृहे बंद आहेत.

सोमवारी ता. 10 मे ला राधेः युअर मोस्ट वॉन्टेड भाई याबद्दल बोलण्यासाठी सलमान खानने झूममार्गे पत्रकारांसोबत संवाद साधला. संवाद दरम्यान, अभिनेत्याने सांगितले की, चाहत्यांशी असलेली आपली वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी आपल्याला ओटीटीवर हा चित्रपट रिलीज करावा लागेल. अभिनेत्याने चाहत्यांना आश्वासन दिले होते की राधेः युअर मोस्ट वॉन्टेड भाई ईदच्या निमित्ताने 13 मे रोजी रिलीज होईल.  Salman khan Radhe movie box office collection will be Zero

सलमान यावेळी म्हणाला, "झीच्या पाठिंब्याशिवाय मी चाहत्यांना दिलेले वचन पूर्ण करु शकलो नसतो. अशा वेळी चित्रपट रिलीज करणे महत्वाचे होते. कारण लोकांना कोरोना आजारामुळे त्रास होत आहे. अनेकांचे उत्पन्न कमी झाले आहे, म्हणून आता, सिनेमागृहात तिकिटावर बरेच पैसे खर्च करण्याऐवजी लोक ते घरी अगदी स्वस्त दराने पाहू शकतात. या भीषण काळात लोकांना मला काही मनोरंजन द्यायचे आहे. "

ईदच्या दिवशी सलमान खान आपला एक चित्रपट रिलीज करतो. हे चित्रपट दरवर्षी बॉक्स ऑफिसवर रिलीज होतात आणि प्रत्येक वेळेस एक नवीन विक्रम Record बनवतात. गेल्या वर्षी, कोरोनाव्हायरस या महामारीमुळे तो राधे ईदच्या दिवशी रिलीज करू शकणार नाही.  Salman khan Radhe movie box office collection will be Zero

परंतु या वर्षीही याची जोरदार एंट्री होऊ शकली नाही.  राधे यंदा ईदला रिलीज होत असताना सिनेमागृहात त्याचे ब्लॉकबस्टर ओपनिंग होणार नाही. 

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com