सांगली जिल्हा तिसऱ्या टप्प्यात; आजपासून निर्बंधात शिथिलता 

सांगली जिल्हा तिसऱ्या टप्प्यात; आजपासून निर्बंधात शिथिलता 
sangali open.jpg

सांगली : कोविड 19  पॉझिटिव्हिटी रेटनुसार सांगली जिल्हा तिसऱ्या स्तरात गेला आहे.  त्यामुळे आजपासून निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे.  त्यामुळे सांगलीच्या  जनतेला आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.  या अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट नसणारी सर्व दुकाने सर्व बाजारपेठ, कापडपेठ, सराफपेठ, सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. (Sangli district in the third phase; Restrictions on restrictions from today) 

सर्व किराणा, भाजीपाला दुकान, फळ विक्रेते, दूध व दुग्धजन्य पदार्थ, डेअरी, बेकरी, मिठाई, पेट शॉप्स व सर्व प्रकारची खाद्य दुकाने मटन, चिकन, पोल्ट्री, मासे आणि अंडी यांसह सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील.  जिल्ह्यातील सर्व अधिकृत भाजीमंड्या सकाळी 7 ते सायंकाळी 4 सुरु राहतील. 

जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागातील सर्व आठवडा बाजार मात्र बंद राहतील... कृषी उत्पन्न बाजार समिती, फळ मार्केटमधील सर्व व्यवहार सकाळी 7 ते सायंकाळी 4  वाजेपर्यंत सुरु राहतील.  बियाणे, खते, शेतीविषयक उपकरणे व त्यांची दुरुस्तीची सेवा देणाऱ्या, तसेच पशुखाद्य दुकाने यांच्या आस्थापना सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. 

Edited By - Anuradha Dhawade 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com