ललिता म्हणते, गावकऱ्यांनो हे बघा असा करा वेळेचा आणि इंटरनेटचा सदुपयोग

ललिता म्हणते, गावकऱ्यांनो हे बघा असा करा वेळेचा आणि इंटरनेटचा सदुपयोग
The schoolgirl showed the villagers how to make good use of her free time and internet

धुळे : फावल्या वेळेचा व इंटरनेटचा Internet चांगला उपयोग Use कसा करायचा ते धुळ्यातील Dhule ललिताने दाखवून दिले आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर Shirpur तालुक्यातील तऱ्हाडी या ग्रामीण भागात राहणाऱ्या पंधरा वर्षीय ललिताने lalita इंटरनेटचा चांगला उपयोग करीत टाकाऊ कपड्यांपासून cloth पायपुसणी बनविण्याचा उत्तम उद्योग सुरू केला आहे. The schoolgirl showed the villagers how to make good use of her free time and internet

त्याच्या बदल्यात ललिताला त्याचा मोबदला देखील उत्तम रीतीने मिळू लागला असून ललिता कडून ही कला शिकण्यासाठी गावातील महिला देखील ललिताकडे येऊ लागल्या आहेत. हळूहळू या महिलांनादेखील रोजंदारीचे साधन ललितामुळे उपलब्ध झाले आहे.

हे देखील पहा -

कोरोनाच्या Corona पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन सुरू आहे आणि त्यातच शाळा-कॉलेज पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला आहे. शिरपूर तालुक्यातील तऱ्हाडी या ग्रामीण भागातील सातवी इयत्तेमध्ये शिकत असलेल्या ललिता खोंडे या पंधरा वर्षीय मुलीने शाळा बंद असल्यामुळे फावल्या वेळेत विरंगुळा म्हणून आपल्या आईचा मोबाइल हाताळत असताना, यूट्यूब वरील पायपुसणी बनविण्याचा व्हिडिओ बघितला आणि त्यातील कृती स्वतः करून बघत स्वतः देखील पायपुसणी बनविण्याची कला हस्तगत केली. The schoolgirl showed the villagers how to make good use of her free time and internet

सुरुवातीला ललिताने घरात उपयोगात येण्यासाठीच पाय पुसण्या बनवल्या परंतु उत्तम रीतीने बनविलेल्या आकर्षक पाय पुसण्या बघून घरच्यांनी तिला आणखी पाय पुसण्या बनविण्यास उत्साहित केले. त्यानंतर ललिताने एकापाठोपाठ एक असे बरेचसे निरनिराळ्या रंगांच्या व डिझाईनच्या टाकाऊ कपड्यांपासून पाय पुसण्या तयार केल्या. त्या पायपुसन्याना गावातील महिलांनी खरेदी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ललिताला घर बसल्या फावल्या वेळेमध्ये शिकलेल्या कलेचा मोबदला देखील तिला मिळू लागला.

ललिताची कला बघून गावातील महिलादेखील ललिताकडे ही कला जोपासण्यासाठी येऊ लागल्यात. ललिता देखील आता गावातील महिलांना मोठ्या उत्साहाने ही कला शिकवत असून यातील काही महिलांनी ललिता कडून शिकलेली कला जोपासत हळूहळू त्यामध्ये आणखी प्रगती केल्यामुळे आता या महिलांना देखील त्याचा मोबदला मिळू लागला आहे. The schoolgirl showed the villagers how to make good use of her free time and internet

त्यामुळे ललिताच संपूर्ण गावातून कौतुक केले जात आहे. कोरोणाच्या काळामध्ये काम धंदा बुडत असल्यामुळे सर्वांनाच आर्थिक चणचण भासत आहे. ललिता सारख्या शाळकरी मुलीने वेळेचा व मोबाईलवरील इंटरनेटचा चांगला उपयोग करीत आपल्यासह गावातील बेरोजगार महिलांच्या देखील हाताला काम मिळवून दिले. आता तिच्या गावातूनच नाही तर आजूबाजूच्या गावांमधून देखील ललिताच्या कलेचे कौतुक केले जात आहे. तसेच तऱ्हाडी या गावामध्ये आजूबाजूच्या गावांमधून पायपुसणी घेण्यासाठी नागरिक येऊ लागले आहेत.

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com