पोटच्या मुलाकडून बापावर गोळीबार बीडच्या आष्टीतील धक्कादायक प्रकार...
Ashti

पोटच्या मुलाकडून बापावर गोळीबार बीडच्या आष्टीतील धक्कादायक प्रकार...

बीड - बापाने आईला मारल्याचा राग अनावर झाल्याने, पोटच्या मुलानेच जन्मदात्या बापावर गोळीबार Firing केला आहे. ही धक्कादायक घटना बीडच्या Beed आष्टी Ashti शहरातील विनायक नगरमध्ये घडली आहे. Shocking Incident; In Beed Son Shot His Father 

संतोष किशन लटपटे वय 50 असे जखमी झालेल्या वडिलांचे Father नाव आहे. तर किरण संतोष लटपटे वय 24 असे गोळीबार करणाऱ्या मुलाचं Son नाव आहे. जखमी संतोष लटपटे हे सैन्य Army दलातून काही दिवसापूर्वी सेवानिवृत्त Retired झालेले आहेत.

हे देखील पहा -

त्यांना दारू पिण्याचे Drinking व्यसन जडले होते. यामुळे या दारूच्या नशेत त्यांनी आपल्या पत्नीला मारहाण केली होती. एवढेच नाही तर ते दररोज दारू पिऊन घरात वाद घालत होते. याच वादामुळे राग Anger अनावर झाल्याने किरण लटपटे या तरुणाने , जन्मदात्या बापावरच गोळीबार करत तीन गोळ्या झाडल्या. Shocking Incident; In Beed Son Shot His Father

या घटनेत संतोष लटपटे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना अहमदनगर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तर आरोपी किरण लटपटे याला, आष्टी पोलिसांनी Police ताब्यात Arrest घेतले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी दिली आहे. 

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com