उल्हासनगर मध्ये दुकानाचा स्लॅब कोसळला

उल्हासनगर मध्ये दुकानाचा स्लॅब कोसळला
Ulhas nagar

उल्हासनगर : उल्हासनगर Ulhasnagar  येथील श्रीराम टॉकीज चौकात आज सकाळी एका दुकानाचा Shop स्लॅब  Slab कोसळला Collapsed आहे. या घटनेत दुकानाचा पुढचा बाजूचा काही भाग आणि शटर पूर्णपणे खाली कोसळले आहे. Shop Slab Collapsed In Ulhasnagar

हे देखील पहा -

त्यामुळे दुकानाचे बरेचसे नुकसान झाले आहे. हे दुकान दोन मजली असून  दुकानात बॅग मटेरियल आहे अशी माहिती मिळाली आहे. हि घटना सकाळच्या सुमारास घडली असल्याने दुकान बंद होते. त्यामुळे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

दुकान परिसरातील हा भाग वर्दळीचा असून, सुदैवाने सकाळ च्या सुमारास ही घटना घडली, दुपारच्या सुमारास ही घडली असती तर जीवितहानी झाली असती. आर के ट्रेडर्स असे या दुकानाचे नाव आहे. Shop Slab Collapsed In Ulhasnagar

सदर घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर महापालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा आढावा घेतला. दोन दिवसांपूर्वीच शहरातील मोहिनी पॅलेस इमारतीचा स्लॅब कोसळून 5 जणांचा गेला बळी होता. आता दोन दिवसात शहरात City स्लॅब कोसळण्याची दुसरी Second घटना Cace घडली आहे. 

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com