सहा हजार भारतीय इराणमध्ये अडकले  

सहा हजार भारतीय इराणमध्ये अडकले  


नवी दिल्ली - नव्याने विषाणूचा संसर्ग झालेल्यांमध्ये महाराष्ट्रातील नऊ, दिल्ली, लडाख आणि उत्तर प्रदेशातील एक आणि एका परकी नागरिकाचाही समावेश असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले. या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांनी घाबरून जाऊ नये, पण काळजी घ्यावी, असे आवाहन केले  आहे . कोरोनाग्रस्त इराणमध्ये सहा हजार भारतीय अडकून पडले असून, त्यांना मायदेशी आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. परराष्ट्र मंत्रालयानेही लोकांनी आवश्‍यक असेल तरच प्रवास करावा, अशी सूचना केली आहे. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने वेगाने पावले उचलायला सुरुवात केली आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये आणखी तेरा जणांची भर पडल्याने एकूण बाधितांची संख्या ७४ वर पोचली आहे. 

कोरोनो विषाणूच्या प्रसारावरही सरकारचे बारीक लक्ष असून, विविध मंत्रालये आणि राज्यांनीही सुरक्षेसाठी म्हणून अनेक उपाय योजले आहेत. यामध्ये व्हिसा सेवांना ब्रेक तसेच आरोग्य क्षमतांमध्ये वाढ आदींचा समावेश आहे, असेही त्यांनी सांगितले.

 भारतातही केवळ बाहेरून आलेल्यांमुळेच हा विषाणू पसरला असून एका व्यक्तीकडून तिच्या अन्य कुटुंबीयांना या विषाणूची लागण होण्याचा धोका अधिक आहे, असे आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी सांगितले.कोरोना विषाणूंना वेगळे पाडण्यात आम्हाला यश आले असून या विषाणूंविरोधातील लस येण्यासाठी किमान दीड ते दोन वर्षांचा अवधी लागेल, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिली आहे. भारतात सुदैवाने या विषाणूचा एका समुदायाकडून दुसऱ्याकडे प्रसार होताना दिसत नाही.   आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या चाचणीसाठी देशभर पुरेशा प्रयोगशाळा असल्याचे म्हटले आहे.
 
दरम्यान, आयपीएल रद्द करण्याची सूचनाही मंत्रालयाने केली असून अंतिम निर्णय मात्र आयोजकांनी घ्यावा, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले. इराणमध्ये  अडकून पडलेल्या नागरिकांमध्ये महाराष्ट्र आणि जम्मू-काश्‍मीरमधील एक हजार यात्रेकरूंचा समावेश आहे. या विषाणूंच्या प्रसाराचा वेग लक्षात घेता भारतीयांनी आहे तेथेच थांबावे अशी सूचना परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे.  कोरोनाबाधित इराणमध्ये सहा हजार भारतीय अडकून पडले असून, त्यांना मायदेशी आणण्यासाठी तीन विमाने पाठविली जाणार असल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकयांनी लोकसभेत बोलताना सांगितले. 

 


Web Title: Six thousand Indians are trapped in Iran

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com