ड्रोनद्वारे जैविक हर्बल फवारणी प्रक्रियेचा प्रयोग यशस्वी

 ड्रोनद्वारे जैविक हर्बल फवारणी प्रक्रियेचा प्रयोग यशस्वी
Successful experiment of organic herbal spraying process by drone

उल्हासनगर -  ठाणे जिल्ह्यातील शहरांची जीवनवाहिनी असणाऱ्या उल्हास नदीच्या पात्रातील जलपर्णी हटविण्यासाठी काही दिवसांपूर्वी प्रथमच ड्रोनद्वारे जैविक प्रक्रियेची मात्रा अवलंबविण्यात आली. Successful experiment of organic herbal spraying process by drone

उल्हास नदीच्या वरप, कांबा, आपटी या भागांतील जलपर्णी सैल होत आहे. असे काही दिवसापुर्वी दिसून आले होते. जलपर्णीवर प्रक्रिया केल्याने जलपर्णीचा विळखा सैल झाला आहे. त्यामुळे  ती आता पिवळी पडू लागली आहे.

हे देखील पहा - 

एरंजाड, आपटी येथे जैविक हर्बल फवारणी झाल्यानंतर काही दिवसांत ही जलपर्णी सुकुन निर्जीव झाली आहे. त्यामुळे रायते पुलाजवळ मोठ्या प्रमाणात जमा झाली आहे. जलपर्णी पाण्याच्या प्रवाहाने वाहत जाऊन नष्ट होण्यास सुरुवात होईल, असे या प्रकल्पाचे प्रमुख चंद्रशेखर भडसावळे यांनी माहिती दिली आहे. 

येत्या काही दिवसांत ही जलपर्णी अजुन सैल होऊन नष्ट होण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे वाहत्या प्रवाहातील हिरवे आच्छादन विरळ होत आहेत. यामुळे पुढील वर्षी उल्हास नदी मोकळा श्वास घेऊ शकणार आहे आहे. 
 

Edited By - Puja Bonkile 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com