लाच म्हणून दारू व मटनाची पार्टी घेणाऱ्या मंडळ अधिकारी व तलाठ्यास अटक 

लाच म्हणून दारू व मटनाची पार्टी घेणाऱ्या मंडळ अधिकारी व तलाठ्यास अटक 
Liqor Drinking

बुलडाणा :  भावाच्या नावे घेतलेल्या प्लॉटची सातबारावर नोंदणी करून फेरफार नक्कल देण्यासाठी दहा हजार रुपये स्वीकारून चक्क दारू Liquor व मटनाची Mutton पार्टी घेणाऱ्या खामगाव येथील मंडळ अधिकारी व तलाठ्यास बुलडाणा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने Anti Corruption Bureau मद्य व मटनावर ताव मारतांनाच रंगेहात अटक Arrest केली आहे. विशेष म्हणजे या कारवाईत  लुचपत प्रतिबंधक विभागाने दोन मद्याच्याही बाटल्या जप्त केल्या आहेत. Talathi Arrested for demanding Bribe of Mutton and Liquor

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने २८ मे रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजेदरम्यान खामगाव तालुक्यातील पिंप्री धनगर शिवारातील प्रल्हाद चव्हाण नामक व्यक्तीच्या शेतातील झोपडीसमोर ही कारवाई केली.

या कारवाईत लाखनवाडा येथील मंडळ अधिकारी विलास साहेबराव खेडेकर (रा. लाखनवाडा) आणि शिर्ला नेमाणे येथील तलाठी बाबुराव उखर्डा मोरे (रा. किन्ही महादेव, खामगाव) या दोघांना अटक केली आहे. खामगाव तालुक्यातील शिर्ला नेमाणे येथील एका ४२ वर्षीय व्यक्तीने त्याच्या भावाच्या नावाने प्लॉट घेतला होता. त्याची सातबारा नोंद घेऊन फेरफार नक्कल देण्यासाठी लाखनवाडा येथील मंडळ अधिकारी विलास साहेबराव खेडेकर आणि तलाठी बाबुराव उखर्डा मोरे यांनी दहा हजार रुपयांची लाच आणि मद्य व मटनाची पार्टी मागितली होती. Talathi Arrested for demanding Bribe of Mutton and Liquor

यातील दहा हजार रुपये यापूर्वी उपरोक्त दोन्ही आरोपींना देण्यात आले होते. मटनाच्या पार्टीसाठी तेवढा आरोपींचा आग्रह सुरू होता.  त्या आधारावर खामगाव तालुक्यातील पिंप्री धनगर येथील प्रल्हाद चव्हाण यांच्या शेतातील झोपडीसमोर दारू व मटनाची पार्टी सुरू असतानांच सापळा रचून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रात्री मंडळ अधिकारी व तलाठ्यास अटक केली.

हे देखिल पहा

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com