पुणे सोलापूर महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात

पुणे सोलापूर महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात
Accident

पुणे : पुणे Pune सोलापूर Solapur महामार्गावर Highway मस्तानी तलावाच्या विरुद्ध बाजूस एमक्युअर कंपनी चे कामगार घेऊन जाणारी बस, ट्रक आणि पीकअप असा तीन वाहनांचा विचित्र अपघात Accident झाला. या अपघातामध्ये बस मधील एक One जण जागीच ठार Death झाला आहे. योगेश मुसमाडे असे या अपघात ठार झालेल्या व्यक्ती चे नाव आहे. Terrible Accident Of Three Vehicles On Pune-Solapur Highway

अपघातानंतर रस्त्यावर वाहतुकीचा बराच वेळ खोळंबा झाला होता. पोलीस Police उपनिरीक्षक संजय नागरगोजे आणि पाटस पोलीस स्टेशन चे कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली. 

हे देखील पहा -

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस टोल नाक्यापासून  अवघ्या एक किलोमीटर अंतरावर मस्तानी तलावाच्या विरुद्ध बाजूस सायंकाळी ७. ३० च्या सुमारास हा अपघात झाला. Terrible Accident Of Three Vehicles On Pune-Solapur Highway

महामार्गावर कंपनी कामगारांना घेऊन जाणारी बस आणि केळी वाहतुक करणारी पिकअप यांच्या चालकात बाचाबाची झाली होती.  दोन्ही वाहने महामार्गावर उभा होती. यावेळी पाठमागून भरधाव येणारा ट्रक आणि या वाहनांचा अपघात झाला.

या अपघातात बस मधील कंपनी कामगार हा बस मधून खाली पडला. जबर जखमी झाल्याने या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण  गंभीर जखमी झाले. हा अपघात पिकअप गाडी नंबर (एम एच 13 आर 7497), भारत बेंझ ट्रॅव्हल्स नं. (एम एच 14 GU 1715) आणि ट्रक नंबर (MH 12 MV5597) या तीन गाड्यांचा अपघात झालेला आहे.Terrible Accident Of Three Vehicles On Pune-Solapur Highway

या अपघातात ओमप्रकाश यादव ( रा  हडपसर ), हिमेश चव्हाण( पुणे) आणि बस चालक मनोहर बंडगर हे जखमी झाले आहेत. यातील दोन जण गंभीर जखमी आहेत. या अपघातात तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. तर पिकअप मधील केळीचे कॅरेट महामार्गावर पडले होते.

Edited By : Krushnarav Sathe
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com