चंडिका माता मंदिरात चोरी; देवीची क्षमा मागत चोर झाला पसार !

चंडिका माता मंदिरात चोरी; देवीची क्षमा मागत चोर झाला पसार !
bhandara

भंडारा - भंडाऱ्यातील पवनी येथे चंडिका माता मंदिरामध्ये चोरी झाल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मात्र हा चोर देवीच्या मंदिरात चोरी केल्या नंतर चक्क देवीला आपण केलेल्या कृत्याची क्षमा मागत आहे ! Theft at Chandika Mata temple thief passed by apologizing to the goddess

चोरी तर केली मात्र केलेल्या चोरीची शिक्षा मिळून नये अश्या श्रद्धेने हा चोर देवीला क्षमा मागत आहे. असे म्हणतात देवा वरील आस्था आणि विश्वास नेहमी श्रद्धापूर्ण भीती कड़े घेऊन जातो मग ती भीती सामान्य माणसाला असो की चोराला सर्वांना सारखीच. 

भंडारा जिल्ह्याच्या पवनी शहरातील सुप्रसिद्ध चंडिका माता मंदिरात मध्यरात्री 2 वाजता 2 चोरांनी प्रवेश केला. त्यांनी दानपेटी फोडत तेथून पैशांची चोरी केली. मात्र लॉकडाऊन असल्याने मंदिरात जास्त पैसे नव्हते.

पैसे घेऊन पहिला चोर निघाला, मात्र दूसरा चोर तिथेच थांबुन देवीला आपल्या चुकीची क्षमा मागु लागला. देवीला हात जोडून नमस्कार करत निघुन गेला. विशेष म्हणजे चोरांनी मंदिरात प्रवेश करतांना पायात चप्पल घातली नव्हती.

हे देखील पहा -

चोरीची ही सर्व घटना सीसीटीवी मध्ये कैद झाली असून पवनी पोलिसांनी  अज्ञात आरोपी विरोधात तक्रार नोंद केली असून पोलिस आरोपीच्या शोधात आहेत.

Edited By : Krushnarav Sathe 
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com