अबब ! स्विफ्ट डिझायरमध्ये येऊन मालवाहतूक गाडी चोरून नेली

अबब ! स्विफ्ट डिझायरमध्ये येऊन मालवाहतूक गाडी चोरून नेली
truck

जालना : स्विफ्ट डिझायरमध्ये Swift Dezire येऊन अज्ञात चोरट्यांनी अशोक लेलँड Ashok Layland कंपनीची मालवाहतूक करणारी गाडी चोरून नेली आहे. ही घटना काल रात्री उशिरा कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिल्लतनगरमध्ये घडली आहे. Thieves Came In Swift Dezire Car and Stolen Away Transport Truck 

या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा Case दाखल करण्यात आला असून चोरटे सीसीटीव्हीत CCTV कैद झाले आहेत. स्विफ्ट डिझायर कारमध्ये येऊन अज्ञात चोरट्यांनी वाहतुकीची गाडी Steal पळवली असल्याचं या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे निष्पन्न झाले आहे.

मिल्लतनगरमधील शेख वसीम शेख मेहमूद यांनी त्यांच्या मालकीची अशोक लेलँड कंपनीची मालवाहतूक करणारी गाडी काल दुपारी ४ वाजेच्या सुमारास घरासमोर उभी केली होती. रात्री जेवण झाल्यानंतर ते बाहेर आले असता गाडी घरासमोर उभी होती.

हे देखील पहा -

मात्र आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास गाडी घरासमोरुन गायब झाली होती. या संदर्भात त्यांनी ड्रायव्हरकडे विचारणा केली असता गाडी नेली नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं. अखेर शेख वसीम यांनी कदीम जालना Jalna पोलिस Police ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com