काळ आलता पण वेळ नाही; अंगावर वीज पडून देखील तिघेजण बचावले !

काळ आलता पण वेळ नाही; अंगावर वीज पडून देखील तिघेजण बचावले !
bhandara

भंडारा - अचानक मेघ गर्जेनेसह पाऊस Rain सुरु झाल्यावर झाडाखाली आश्रय घेतलेल्या 3 व्यक्तींवर वीज Lightining पडून जखमी झाल्याची घटना भंडारा Bhandara जिल्ह्याच्या लाखांदुर Lakhandur तालुक्यातील आथली गावात घडली आहे. Three Saved Even After Being Struck By Lightning

अनिता अशोक बेदरे वय 35 वर्ष, जयंत अशोक बेदरे वय 13 वर्ष व विक्की पंढरी उरकुडे वय 15 वर्ष तिघेही राहणार आथली अशी घटनेतील जखमींची नावे आहेत. लाखांदूर तालुक्यात सर्वञच उन्हाळी धान कापणी व मळणीला वेग आला आहे. 

तर काही भागात खरीप पुर्व मशागतीला सुरुवात करण्यात आली आहे. घटनेतील तिन्ही जखमी अन्य काही जणांसह शेतामध्ये शेती मशागतीची कामे करावयास गेले होते. दुपारी अचानक वादळ वाऱ्यासह पावसाने सुरुवात केल्याने त्यापासुन बचावासाठी लगतच्या झाडाखाली तिघेही जण थांबले. Three Saved Even After Being Struck By Lightning

हे देखील पहा -

तेवढ्यात अचानक विज चमकली व तिघेही जागेवर बेशुद्ध पडले.  थोड्या वेळातच नजीकच्या शेतशिवारात काम करणाऱ्या मजुरांनी घटनेची माहिती गावकऱ्यांना देत जखमींना उपचारार्थ लाखांदुर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून तिघांची प्रकृति आता स्थिर असून त्यांच्यावर उपचार Treatment सुरु आहेत.

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com