लाॅकडाऊनच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या तोतया पोलिसांना बेड्या

लाॅकडाऊनच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या तोतया पोलिसांना बेड्या
Two Arrested for Posing as Police Officers

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई Mumbai सर्वत्र लाॅकडाऊन Lock Down करण्यात आले आहे. या संधीचा फायदा घेऊन दोन तोतया पोलीस Police अधिकारी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई च्या नावाखाली लूट करत असल्याचे समोर आले आहे. या तोतया अधिकाऱ्यांना दहिसर पोलिसांनी अटक Arrest केली आहे. या दोघांनी अशा प्रकारे अनेकांना लुटल्याचा पोलीस तपासात समोर देखील आले आहे. Two Bogus Police Officers Caught by Dahisar Police

संदीप खोत आणि रमेश मिश्रा हे दोन तोतया अधिकारी मागील अनेक दिवसांपासून दहिसर Dahisar परिसरात गाडीने फिरायचे. या दरम्यान लाॅकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांना ते आडवून त्यांच्या कडून कारवाईच्या नावाखाली लूट करायचे. समोरच्याला विश्वास बसावा म्हणून या दोघांनी पोलिसांचं बनावट ओळखपत्र ही बनवलं होतं. तर तोंडावरील मास्क देखील महाराष्ट्र पोलिसांचा लोगो असलेला वापरायचे.

हे देखिल पहा

नुकतेच त्या दोघांनी दहिसर च्या आनंद नगर येथील एका पान टपरीवाल्याला पकडलं. लाॅकडऊन नियमांचं उल्लघंन केल्याचं सांगत या दोघांनी त्याच्या दुकानातील 70 हजारांची सिगारेट पाकीटं घेतली. ऐवढ्यावरचं न थांबता. त्याला पकडून जबरदस्ती त्यांच्या गाडीतही बसवले. त्याला काही अंतरावर नेहून त्याच्याकडून 7 हजार काढून घेत त्याला सोडले.

घरी आल्यानंतर त्याने कारवाई केलेल्या क्राइम ब्रांच अधिकाऱ्यांची नाव सांगत विचारपूस केली. त्यावेळी असे कोणीही क्राईम ब्रान्च अधिकारी नसल्याचं समोर आलं. त्यानंतर फसवणूक झालेल्या व्यक्तीने दहिसर पोलिस ठाण्यांमध्ये या दोन तोतया अधिकाऱ्यांविरोधात तक्रार नोंदवली. Two Bogus Police Officers Caught by Dahisar Police

या घटनेची गंभीर दखल घेत दहिसर पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेचे अधिकारी ओम तोटावार यांनी सीसटिव्हीच्या मदतीने आरोपींचा माग काढण्यास सुरूवात केली.  तपासात दरम्यान या दोघांची ओळख पटल्यानंतर या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांवर अशाया दोघांवर अशाप्रकारे फसवणुकीचे अनेक गुन्हे असल्याचे देखील तपासात समोर आले आहे.

Edited By - Amit Golwalkar
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com