सोलापुरात भाजपच्या आमदार आणि खासदारांचे लाक्षणिक उपोषण

सोलापुरात भाजपच्या आमदार आणि खासदारांचे लाक्षणिक उपोषण
Solpaur

सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज भाजपच्या BJP ८ आमदार MLA आणि २ खासदारांनी MP लाक्षणिक उपोषण Fast  केले. रेमडेसीवीर इंजेक्शन,ऑक्सिजन आणि कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा करताना सोलापूर जिल्ह्यावर अन्याय होत असल्याचा आरोप यावेळी भाजपच्या सर्व आमदार-खासदारांकडून करण्यात आला आहे. Typical Fast of BJP MLAs and MPs in Solapur

हे देखील पहा -

त्याचबरोबर सोलापूरच्या हक्काचे उजनी धरणाचे पाच टीएमसी पाणी पळवण्याचा घाट हाणून पडणार असा निश्चय सुद्धा भाजपने यावेळी केला आहे. यावेळी आंदोलनकर्त्या भाजप आमदार-खासदारांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती केली आहे. मागण्या दोन दिवसात पूर्ण नाही झाल्या तर उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे.

या आंदोलनाला बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख, सोलापूर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख, पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे, माळशिरसचे आमदार राम सातपुते, विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, प्रशांत परिचारक, माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि सोलापूरचे खासदार डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य उपस्थित होते.Typical Fast of BJP MLAs and MPs in Solapur

Edited By : Krushna Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com