नांदेडमध्ये मुस्लिम बांधवाची जगावेगळी ईद

नांदेडमध्ये मुस्लिम बांधवाची जगावेगळी ईद
Nanded

नांदेड - संपुर्ण जगभर मुस्लिम Muslim बांधवांनी रमजान ईद Ramdan Eid उत्साहात साजरी केली आहे. मात्र, नांदेड Nanded इथे मुस्लिम बांधवांनी कोरोनामुळे Corona  मृत्यू Death झालेल्या व्यक्तींवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार Funeral करत सामाजिक बांधिलकी जपणारी अनोखी ईद साजरी केलीय.

नांदेड मधील मुस्लिम बांधवांचा हॅप्पी क्लब Happy Club नावाचा सामाजिक गट कार्यरत आहे. कोरोना काळात कुणीही मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी धजावत नसताना हॅप्पी क्लबने पुढाकार घेत वर्ष भरात जवळपास 950 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत.

 हे देखील पहा -

ईदच्या दिवशीही मुस्लिम बांधवानी सामाजिक दायित्वाला प्राधान्य देत कोरोनामुळे मृत झालेल्या एका ख्रिश्चन व्यक्ती च्या पार्थिवाचा दफन विधी पार पाडला. हिंदु, मुस्लिम आणि ख्रिश्चन अश्या कुठल्याही धर्माच्या व्यक्ती चा कोरोनाने मृत्यू झाल्यास मुस्लिम बांधवाचा हॅप्पी क्लबच्या वतीने ज्या त्या धर्माच्या पध्दतीने अंत्यसंस्कार करण्यात येतो. 

एकीकडे कोरोनाच्या भितीमुळे रक्ताचं नातं असलेली माणसे  जात आहेत. ज्यांनी जन्म दिला त्यांच्या अंत्यसंस्काराला देखील ते उपस्थित राहत नाहीत अश्यातच हॅप्पी क्लबचे अंत्यसंस्काराचे काम अविरत सुरू आहे.

Edited By : Krushna Sathe 


 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com