लॉकडाऊनमध्ये तिचा 14 किलोमीटरचा खडतर प्रवास! लहान मुलं,गर्भवती महिलांना पोहचवला पोषण आहार

लॉकडाऊनमध्ये तिचा 14 किलोमीटरचा खडतर प्रवास! लहान मुलं,गर्भवती महिलांना पोहचवला पोषण आहार

लॉकडाऊनमध्ये तीनं घेतला समाजसेवेचा वसा. दुर्गम आदिवासी भागातील लहान मुलं, गर्भवती महिलांपर्यंत पोहचवला पोषण आहार. थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही घेतली तिच्या कामाची दखल. कोण आहे नंदुरबार जिल्ह्यातील अन्नपूर्णा पाहुयात खास रिपोर्ट

रेलू वसावे, अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदेच्या काठावरील चिमलखेडीतल्या अंगणवाडी सेविका. दररोज सकाळी दोन तास नाव चालवून 14 किलोमीटरचा प्रवास करतात. त्यानंतर डोंगराळ भागात पायीच प्रवास करतात. त्यांचा हाच प्रवास त्यांची ओळख बनलाय. कारण तो तुमच्या आमच्या सारखा साधा-सुधा नव्हता तर  आदिवासी पाड्यातील गर्भवती महिला, लहान बालकांसाठी होता.
लॉकडाऊनच्या काळात सगळं ठप्प असताना रेलू वसावे यांनी गर्भवती महिला, लहान बालकांना नियमित पोषण आहार पुरवला

दररोज 14 किलोमीटर नाव चालवणं, मग गावक-यांची सेवा करणं, शिवाय आपल्या दोन मुलांना जपणं, 27 वर्षांच्या रेलू हे सगळं अगदी प्रामाणिकपणे करत असतात. त्यांच्या या प्रामाणिकपणाची दखल अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही घेतलीय. जिल्हा अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी त्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव केला

एप्रिल महिन्यापासूनच आठवड्यातील पाच दिवस नावेतून १८ किलोमीटरचा प्रवास करत आहेत.त्यांचा हा प्रवास अनेकांना समाजासाठी काही तरी करण्याची नक्कीच प्रेरणा देईल. त्यांच्या या कार्याला साम टीव्हीचा सलाम

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com