VIDEO | कोरोनाच्या भीतीनं एकच विद्यार्थी शाळेत आला आणि मग पुढे काय झालं? तुम्हीच पाहा

VIDEO | कोरोनाच्या भीतीनं एकच विद्यार्थी शाळेत आला आणि मग पुढे काय झालं? तुम्हीच पाहा

तब्बल 8 महिन्यानंतर महाराष्ट्रातील काही भागात शाळा उघडल्या. मात्र कोरोनाबाबत  पालकांच्या मनात अद्यापही भीती आहे. शाळा सुरु झाल्या पण शाळेत विद्यार्थी आले नाहीत. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा.भा.शिर्के प्रशालेत तर एकच विद्यार्थी उपस्थित होता.

परीक्षा झाल्या नाहीत. परीक्षा न होता पोरं पास झाली. उन्हाळ्याची सुट्टी लॉकडाऊनमधी गेली. पावसाळा अख्खा पोरांनी घरात घालवला. शेवटी दिवाळीची सुट्टी पण त्या लॉकडाऊनमधी मोडली. घरी बसलेल्या पोरांच्या कानावर शेवटी ही आवाज ला.(घंटेचा आवाज शाळेच्या). 

शाळात पोरं येणार म्हणून शिपाई मामाबी कामाला लागलं. शाळात परत किलबिलाट होईल म्हणून शिपाई मामांनी पोरांच्या सुरक्षेची खबरदारी घेत सगळी बाकं सॅनिटाझरनं पुसून घेईतली. अख्खा वर्ग  सॅनिटाझ केला.  

अन् अखेर पहिला पट्टा रिक्षातनं उतरला. तोंडावर मास्क सुरक्षित अंतर ठेवून गडी शाळंकडं निघाला एकटाच. गड्याला चुकल्यावानी वाटत असलं पण शाळाच्या गेटवर हातावर सॅनिटाझर देऊन स्वागत केलं अन् टेम्परेचर बी तपासलं. शाळात सगळ्या विषयाचं शिक्षक हजर होतं. पण विद्यार्थी मात्र एक वगळता गैरहजर.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सरकार आन् प्रशासन वेळोवेळी खबरदारी घेतंय. पहिल्या दिवसापासून सूचना करतंय. पालक अन् विद्यार्थीपण सूचनांचं पालन करतायत. खरबदारी म्हणून पालकांनी मुलांना शाळत पाठवायचं नाय ठरवलं. खरतंर अंतिम निर्णय हा पालकांचा. पण खात्रीनं सांगतो. एक दिवस हिच शाळा पुन्हा भरणार 100 टक्के हजेरी सह अन् तेव्हा कोरोना संपला असंल 
 


 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com