VIDEO | तुमच्या गावात होणार बर्फवृष्टी

VIDEO | तुमच्या गावात होणार बर्फवृष्टी

येत्या काही वर्षात तुमच्या गावात अशाच प्रकारे बर्फवृष्टी होऊ शकते...कदाचित यावर तुमचा विश्वास बसणार नाही...मात्र हे खरं आहे...तुमच्या गावावर पावसाप्रमाणेच आता बर्फवृष्टी होणार आहे.... नॉथ्युमब्रियाच्या विद्यापीठातील एका शास्त्रज्ञानं तसा दावा केलाय

काय आहे शास्त्रज्ञांचा दावा 


दोनशे वर्षात पहिल्यांदाच सूर्याची कार्यगती सर्वात कमी होणार आहे. त्यामुऴं सुर्याची उर्जा मोठ्या प्रमाणात घटणार आहे. यातून पृथ्वीवरचं तापमान घटण्याची शक्यता आहे. तापमानात मोठी घट झाल्यानं हिवाळा अधिक कडक होऊन हिमवादळे निर्माण होऊ  शकतात. हिमवादळांमुळं अन्नधान्याच्या टंचाईचाही धोका निर्माण होऊ शकतो 


सतराव्या आणि एकोणिसाव्या शतकात सरासरी तापमान 2 अंशांनी घटल्यानं इंग्लंडमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती..पुन्हा एकदा याच इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची भीती शास्त्रज्ञांना वाटतेय...भारतीय शास्त्रज्ञ मात्र या दाव्याशी सहमत नाहीत

ग्लोबल वॉर्मिंग हे जगासमोरचं मोठं संकट आहे. अशातच मिनी हिमयुगाचा अंदाज म्हणजे पृथ्वी विनाशाकडे तर जात नाही नां असंच म्हणावं लागेल

WebTittle :: VIDEO | There will be snowfall in your town

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com