येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या घरी 'ईडी'चा छापा 

येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या घरी 'ईडी'चा छापा 


मुंबई : देशभरात सगळीकडे येस बॅंकेच्या आर्थिक संकटाची चर्चा सुरू असतानाच बॅंकेचे संस्थापक व माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर यांनी बॅंकेत चालू असलेल्या कोणत्याही घडामोडीबाबत पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे म्हटले आहे. बॅंकेतून व्यवस्थापकीय संचालक पदावरून पायउतार झाल्यापासून मागील 13 महिन्यांत बॅंकेतील दैनंदिन कामकाजाविषयी माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.  बॅंकेची मुहूर्तमेढ रोवण्यापासून ते 3.4 लाख कोटींचे भागभांडवल असलेली बॅंक बनविण्यात राणा कपूर यांचा सिंहाचा वाटा होता.

हेही पाहा : YES BANK | येस बँकेचं 'महाभारत'
येस बँक म्हणजे राणा कपूर
प्रामुख्याने कॉर्पोरेट फायनान्सशी संबंधित कामकाज असलेल्या येस बॅंकेचा समभाग कपूर यांच्याच कार्यकाळात चारशे रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोचला होता. एकेकाळी येस बॅंक म्हणजेच राणा कपूर असे घट्ट समीकरण बनलेले असताना त्यांच्या कार्यकाळाला मुदतवाढ देण्यास रिझर्व्ह बॅंकेने नकार दिल्यानंतर राणा कपूर यांनी बॅंकेशी संबंध तोडले होते. बॅंकेपासून अलिप्त होताना त्यांनी बॅंकेतील भागीदारी संपविण्यासाठी समभाग विक्रीला प्राधान्य दिले. त्याचाच भाग म्हणून त्यांनी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात 2.75 टक्के आणि नोव्हेंबर महिन्यात राहिलेला 1.8 आणि 0.8 हिस्सा विक्री करून सर्व समभाग विकले होते. 

Web Title: ed raids yes bank founder rana kapoor residence worli Mumbai

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com