VIDEO | लोकशाहीला काळिमा फासणारी बातमी

साम टीव्ही
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील निघोज ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीला एक वेगळं वळण लागलंय. इथं निवडणुकीपूर्वीच चक्क दोन सदस्यांचं अपहरण झाल्यानं खळबळ उडालीय. पाहूयात निघोजच्या गावगाड्यात नेमकं घडलंय काय ? सरपंचपदाच्या निवडणुकीचं राजकारण तापलं निवडणुकीपूर्वीच दोन सद्स्यांचं अपहरण 

अहमदनगरच्या निघोज ग्रामपंचायतीतील धक्कादायक प्रकार 

 अहमदनगरच्यानिघोज ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 9 फेब्रुवारीला निवडणूक होणारंय.17सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीचे 9 सदस्य आहेत.सरंपचपदाच्या निवडणुकीपूर्वी हे सदस्य 4 दिवस फिरण्यासाठी बाहेरगावी गेले होते. तिथून निघोजकडे परतत असताना वाटेत खेड इथं एका हॉटेलवर सदस्य थांबले.

तिथच 25 ते 30 जणांनी शस्त्राचा धाक दाखवून दोन सदस्यांना पळवून नेलंअसल्याची तक्रार खेड पोलिसांत करण्यात आलीय.बाहेरगावी गेलल्या 9 सदस्यांपैकी दिगंबर  लाळगे आणि गणेश कवाडे या दोन सदस्याचं अपहरण झाल्यानं ग्रामस्थांनीगाव बंदची हाक दिलीय. इतकच नाही तर मंगळवारी होणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कारही टाकलाय. सदस्यांना शोधून अपहरणकर्त्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होते. 

 सरपंचपदाचा लिलाव, निवडणुकीत झालेला पैशांचा बाजार आणि आता  सदस्यांचं अपहरण.यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत लोकशाहीचा अक्षरशबाजार मांडला गेलाय. लोकाशाहीला काळीमा फासणाऱ्या लोकांना कायद्याचा धाकच उरला नाही का? हा सवाल यानिमित्तानं उपस्थित होतोय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live