मराठा आरक्षणाची सुनावणी पुन्हा 4 आठवडे पुढे ढकलली, कोर्टाच्या निर्णयाने छत्र

साम टीव्ही
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

मराठा आरक्षणावरील सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आलीय. मराठा आरक्षणप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर पहिल्यांदाच ही सुनावणी पार पडली.

मराठा आरक्षणावरील सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आलीय. मराठा आरक्षणप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर पहिल्यांदाच ही सुनावणी पार पडली.

राज्यात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर असणारी नाराजी तसंच आरोप-प्रत्यारोप होत असताना होणाऱ्या या सुनावणीकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. मराठा आरक्षणावरील सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आलीय. तसंच यामुळे पाच न्यायामूर्तींच्या खंडपीठाकडं जावं, त्याचं लिस्टींग व्हावं यासाठी सरकारला वेळ मिळाला आहे. न्यायमूर्ती नागेश्वर राव यांनी सरकारी वकिलांचं म्हणणं मान्य केलं. तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठांऐवजी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी व्हावी अशी मागणी सरकारकडून करण्यात आली होती. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला.

मराठा आरक्षणाच्या निर्णयाबाबत छत्रपती संभाजीराजे नाराज असल्याचंही कळतंय. दरम्यान, अशा पद्धतीचा निर्णय अपेक्षित नसून कोर्टानं असं आधीच करायला हवं होतं, असंही संभाजीराजे म्हणाले. यासंदर्भात याचिकाकर्ते विनोद पाटील यांनीही हा निर्णय मान्य नसल्याचं म्हटलंय तर आता यापुढे मराठा आंदोलक आणखी आक्रमक होतील का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 

आज मराठा आरक्षणाच्या निर्णयासंदर्भात सुप्रीम कोर्टानं पुढील 4 आठवडे ही सुनावणी पुढे ढकललीय. तर पाच न्यायामूर्तींच्या खंडपीठाकडं जावं, त्याचं लिस्टींग व्हावं, असंही कोर्टानं सांगितलंय.


संबंधित बातम्या

Saam TV Live