पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच - उद्धव ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 29 सप्टेंबर 2019

 

मुंबई : युतीचे घोडे अडले असतानाच शिवसेनेने पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाचा दावा करत भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. ""माझे आणि अमित शहांचे बोलणे झाले असून, युतीची घोषणा येत्या दोन दिवसांमध्ये जाहीर करण्यात येईल. शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही,'' असा विश्‍वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केला आहे. 

 

मुंबई : युतीचे घोडे अडले असतानाच शिवसेनेने पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाचा दावा करत भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. ""माझे आणि अमित शहांचे बोलणे झाले असून, युतीची घोषणा येत्या दोन दिवसांमध्ये जाहीर करण्यात येईल. शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही,'' असा विश्‍वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केला आहे. 

रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. ""शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचे वचन मी शिवसेनाप्रमुखांना दिलेले आहे. हे वचन पूर्ण करण्याची मी शपथ घेतली आहे. यामुळे विधानसभेत भगवा फडकवण्यासाठी प्रयत्न करा,'' असे सांगून त्यांनी शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेशही या वेळी दिले.

निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड हा माझ्यासाठी फार कठीण काळ असतो. मी म्हणजे भगवा, मी म्हणजे शिवसेना, हा भगवा महाराष्ट्राच्या विधानसभेवर फडकला पाहिजे, यासाठी प्रयत्न करा. मला या वेळी विधानसभेत सत्ता हवी आहे. मला हात वर करून वचन द्या, की आम्ही शिवसेनेशी आणि भगव्याशी इमान राखू, अशी भावनिक सादही उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना घातली. 

शिवसेना- भाजप युतीची घोषणा लवकरच होईल. युती झाली तर जिथे भाजप असेल, तिथे आपली ताकद त्यांच्यासोबत आणि जिथे शिवसेना असेल तिथे भाजपची ताकद नेहमीच सोबत असायला हवी, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही शिवरायांचे मावळे आहोत. कपट- कारस्थान आमच्याकडे नाही आणि गनिमी कावा हा गनिमांसाठी आहे, असा इशारा देत युतीप्रकरणी नमते घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी भाजपला दिला. 

मला पवारांच्या कौटुंबिक भांडणात रस नाही, त्यामुळे मला कोणाबद्दल वाईट बोलण्यात अजिबात आनंद वाटत नाही. जर कोणी सूड उगवण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्र त्याच्यावर आसूड उगारल्याशिवाय राहणार नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना लगावला. आम्ही संघर्ष करून ही सत्ता निर्माण केली. आपल्या कर्माने जो मरणार, त्याला धर्माने मारू नका, असे बाळासाहेब म्हणायचे. जो शिवसेनेशी वाईट वागतो, त्यांना त्याचे फळ मिळते, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीका केली. 

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची त्यांच्या "सिल्व्हर ओक' या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या वेळी बंद दरवाजाआड दोघांमध्ये 15 मिनिटे चर्चा झाली. "ईडी' चौकशी प्रकरणात शिवसेनेने शरद पवार यांना पाठिंबा दिला.

याबाबत पवार यांनी शिवसेनेचे आभार मानले. उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून संजय राऊत यांनी पवार यांची भेट घेऊन शिवसेना त्यांच्यासोबत आहे, असे सांगितल्याचे समजते. याबाबत बोलताना संजय राऊत यांनी आपण सदिच्छा भेट घेतल्याचे सांगितले.

Web Title: Next CM of Maharashtra will be Shivsenas says Uddhav Thackeray Maharashtra Vidhan Sabha 2019


संबंधित बातम्या

Saam TV Live