भिमा कोरेगावचा तपास करण्याचा NIA ला अधिकार : मुनगंटीवार 

सरकारनामा
रविवार, 26 जानेवारी 2020

मुंबई : NIA ची स्थापना कॉंग्रेसने केली आहे. तसा तपास करण्याचा अधिकार या संस्थेला आहे. गडचिरोली मधील जवांनाचा तपास NIA करत आहे. 
भिमा कोरेगाव घटना झाली तेव्हा युती सरकार ला अस्थिर करण्याचा प्रयत्न काही जणांमार्फत केला जात होता अशी माहिती भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली. 

एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा प्रकरण केंद्र सरकारने एनआयएकडे सोपविण्याच्या निर्णयामुळे महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. या मुद्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. विशेषत: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले आहे. 

या मुद्याकडे लक्ष वेधत पत्रकारांशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, की आता आरोप चार्ज करायची वेळी आली. तो चार्ज होऊ नये न्यायालयात माहीती पोहचू नये याची भीती राज्यसरकारला वाटत आहे. NIA ला तपास करताना राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागत नाही.

NIA एका राजकिय पक्षाची युवा शाखा नाही. भिमा कोरेगावचे सर्व तपशील हे दिपक केसरकर यांनी विधानसभेत दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कसा तपास होऊ शकतो. स्वत:ला वाचवण्यासाठी हे खोटे आरोप करत आहेत अशी टीकाही मुनगंटीवार यांनी आज केली. 

WebTittle :: NIA empowers Bhima Koregaon to investigate: Mungantiwar

संबंधित बातम्या

Saam TV Live